जगातील सर्वात मोठा महामार्ग तीन वर्षात पूर्ण होईल : नितीन गडकरी

जगातील सर्वात मोठा महामार्ग तीन वर्षात पूर्ण होईल : नितीन गडकरी

नागपूर : मुंबई-दिल्ली या जगातील सर्वात मोठ्या महामार्गाचे 60 टक्के ठेके देण्याचे काम पूर्ण झाले आहे. 2022 पर्यत या रस्त्याचे काम पूर्ण करण्याचा संकल्प केला असल्याचे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी आज म्हणाले. विमानतळावर कार्यकर्त्यांकडून स्वागत स्वीकारल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांना त्यांनी ही माहिती दिली. जितकी या देशाची लोकसंख्या आहे, तेवढेच वृक्ष रस्त्यांच्या दुतर्फा लावून देशाला हरित राष्ट्र बनवायचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

गंगा शुद्धीकरणाची 30 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. जलवाहतूक सुरु झाली आहे. मार्च 2020 च्या पूर्वी गंगा पूर्णपणे निर्मल, शुद्ध होईल असा शब्द त्यांनी दिला. यावेळी जे खाती मिळाली आहेत ती चांगली आहेत. लघुउद्योगांच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण भागात मोठा रोजगार निर्माण करायचा आहे. लघुउद्योग भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. खादीची मागणी देशविदेशात वाढत आहे. त्यामुळे खादीसह लघुउद्योगातून निर्मीत वस्तुंची निर्यात वाढविण्यावर भर राहणार आहे. मध सुद्धा मोठ्या प्रमाणात निर्यात करु शकतो. हॅन्डलूम, हॅन्डीक्राफ्ट यावर पुढील वर्षीपर्यंत मोठे काम करणार येईल. बांबूपासून लाईट डिझेल बनविण्याचा प्रयोग यशस्वी झाला असून लवकरच त्याचे उत्पादन सुरु केले जाईल. 

महाराष्ट्रात रस्ते, पाणी यासाठी मोठे काम करायचे आहे. राज्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या कामात 170 "ब्रीज कम बंधारे' बांधायचे आहेत. नदी नाल्यांचे खोलीकरण करुन त्यातून निघालेले माती, मुरुम, दगड रस्त्यांच्या बांधकामात वापरण्याचे नियोजन केले आहे. राज्यातील जुन्या पुलांनाही "ब्रीज कम बंधारे' बनवायचे आहे. नद्यांमधे प्रत्येक 50, 100 कीलोमीटर अंतरावर बंधारे बांधून पाणी अडविले जाणार आहे. राज्यात 108 बळीराजा आणि 26 सिंचन प्रकल्प आहेत. जलशक्ती विभागातून ही कामे केली 
जातील. जरी मी या खात्याचा मंत्री नसलो, तरी या कामांसाठी पैसा कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही गडकरींनी दिली. यावर्षी महाराष्ट्रात पडलेला दुष्काळ हा कदाचित शेवटचा असेल, असे नितीन गडकरी म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com