उद्योजकांनी बॅंकांवर अवलंबून राहू नये - नितीन गडकरी

उद्योगांच्या विविध धोरणांबाबत चर्चा करून भविष्यातील उद्योगांपुढे येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आपण तत्पर आहोत. पण उद्योजकांनी उद्योगांसाठी बॅंकांवर अवलंबून राहण्यापेक्षा शेअर मार्केट, स्टॉक एक्‍सचेंज मध्ये गुंतवणूक करावी असा सल्ला देखील नितीन गडकरी यांनी दिला.
 उद्योजकांनी बॅंकांवर अवलंबून राहू नये - नितीन गडकरी

औरंगाबाद : उद्योजकांनी नव्या उद्योगांसाठी बॅंकांवर अवलंबून न राहता शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करावी असे आवाहन करतानाच नवनिर्मीतीवर भर द्यावा असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. मराठवाड्यात कृषी आधारित उद्योग वाढण्याची आवश्‍यकता असून कॉर्पोरेट उद्योजकांनी कृषी उद्योगांतील गुंतवणुकीवर अधिक भर द्यावा असा सल्ला देखील गडकरींनी दिला. 

औरंगाबाद येथे "चेंबर ऑफ कॉमर्स'च्या वतीने आयोजित एसएसएमई असोसिएशनच्या प्रतिनिधींशी गडकरी संवाद साधत होते. आमदार हरिभाऊ बागडे, संभाजी पाटील निलंगेकर, अतुल सावे, केंद्रीय उद्योग सचिव राम मनोहर मिश्रा, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, मराठवाडा लघुउद्योग व कृषी संघटना औरंगाबादचे अध्यक्ष डी.एल.राजळे आदींची यावेळी उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करतांना गडकरी म्हणाले, उद्योजकांनी कृषीवर आधारित खादी उद्योग, शेरी कल्चर, फर्नीचर, बायोइंधन, बांबु तसेच सोलार क्‍लस्टर सारख्या उद्योगांवर भर द्यावा. ग्रामीण उद्योगांचा विकास झाल्यास शहरी उद्योगांवर ही सकारात्मक परिणाम होतो. 

उद्योगांच्या विविध धोरणांबाबत चर्चा करून भविष्यातील उद्योगांपुढे येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आपण तत्पर आहोत. पण उद्योजकांनी उद्योगांसाठी बॅंकांवर अवलंबून राहण्यापेक्षा शेअर मार्केट, स्टॉक एक्‍सचेंज मध्ये गुंतवणूक करावी असा सल्ला देखील नितीन गडकरी यांनी दिला. 

औरंगाबाद-जळगाव रस्ता लवकरच पूर्ण होतील 
उद्योगाविषयी चर्चा केल्यानंतर गडकरी यांनी मराठवाड्यातील रस्ते कामांचा आढावा घेतला. औरंगाबाद-शिर्डी, सोलापूर-धुळे, औरंगाबाद-जळगाव रस्त्यांची कामे सुरू असून लवकरच ती पूर्ण होतील असे आश्‍वासन त्यांनी बैठकीत दिले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com