fule puraskar to sharad pawar | Sarkarnama

मनुवादी विचार संपविण्यासाठी पुरोगामी विचार वाढविला पाहिजे : शरद पवार 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 28 नोव्हेंबर 2018

पुणे : देशात प्रतिगामी विचार पुन्हा एकदा प्रसूत होत होत असून मनुवादाचा विचार पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. हा विचार संपवायचा असेल तर महात्मा व सावित्रीबाई फुले यांच्या पुरोगामी विचाराने पुढे गेले पाहिजे, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी व्यक्त केले. 

महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने देण्यात येणाऱ्या महात्मा फुले समता पुरस्काराने शरद पवार यांना आज सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. 

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार पवार यांना प्रदान करण्यात आला. पवार म्हणाले, "" प्रतिभा पाटील राजस्थानच्या राज्यपाल होत्या. त्या राजस्थानच्या मंत्रालयासमोर मनुचा पुतळा उभारण्यात आला आहे. मागील काही काळात देशात ज्या प्रकारचे वातावरण निर्माण केले जात आहे

ते देशासाठी घातक आहे. जातीवाद-धर्मवादाच्या नावाखाली द्वेष पसरविण्याचे काम सुरू असून मनुवादाचे समर्थक करणारे विचार आज पुन्हा एकदा डोके वर काढू पाहात आहे. मनुवादाचा हा विचार संपवायचा असले तर आपण सर्वांनी महात्मा फुले व ज्योतिबा फुले यांचा विचार घेऊन निर्धाराने पुढे जाण्याची गरज आहे.'' 

पवार म्हणाले,"" देशातील अनेक विद्यापीठांनी डॉक्‍टरेट दिल्या. विविध पुरस्कार मिळाले. मात्र काही पुरस्कारामागे विचार असतात. त्यामुळे महात्मा फुले यांच्या नावाने मिळालेल्या या पुरस्कारचे वेगळे समाधान आहे. ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले हे काळाच्या पुढे चालणारे दाम्पत्य होते. 

पंचम जॉर्ज ज्यावेळी भारतात आले. त्यावेळी त्यांच्याकडे येथील शतेकऱ्यांच्या व्यथा मांडताना त्यांनी इथल्या शेतकऱ्याची स्थिती मांडली. ज्वारीचे उत्पादन वाढविण्यासाठी परदेशातील चांगल्या प्रतीचे बियाने शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे, दुधाच्या उत्पादनवाढीसाठी चांगल्या प्रतीचे वळूचे "क्रॉसब्रिड' उपल्बध करून देण्यात यावे या प्रकारच्या मागण्या त्यांनी पंचम जॉर्जकडे केल्या.दीडशे वर्षापूर्वी या प्रकारे आधुनिक विचार करणारे फुले हे खऱ्या अर्थाने दूरदृष्टी असलेले सुधारक होते. त्यांचा समतेचा विचार पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.'' 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख