फुलंब्रीत नानांचा करिश्‍मा कायम, कॉंग्रेसच्या काळेंचा केला पराभव

..
Haribhau_bagde_kalyan_kale
Haribhau_bagde_kalyan_kale

औरंगाबादः फुलंब्री विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीचे हरिभाऊ बागडे यांचा करिश्‍मा पुन्हा एकदा दिसून आला. यावेळी पंधरा हजार मतांची आघाडी घेत त्यांनी कॉंग्रेसच्या डॉ. कल्याण काळे यांचा दुसऱ्यांदा पराभव केला.

मतदारसंघात केलेली विकासकामे विरुध्द सरकारकडून शेतकऱ्यांची झालेली फसवणूक असा प्रचार फुलंब्रीत रंगला होता. पण मतदारांनी नानांच्या विकासाला मत देत त्यांना दुसऱ्यांदा विजयी केले.

फुंलब्री विधानसभा मतदारसंघातून विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची उमेदवारी कापली जाणार अशी चर्चा विरोधक आणि स्वपक्षीयांकडून केली गेली. पण बागडे यांचे वाढते वय आणि त्यांचा राजकारणातला अनुभव पाहता पक्षाने पुन्हा त्यांच्यावरच विश्‍वास दाखवला. उमेदवारी जाहीर झाल्यावर बागडे यांनी झपाटून प्रचार करत मतदारसंघातील प्रत्येक गाव, वस्ती, तांडा पिंजून काढला होता.

कॉंग्रेसने बागडे यांच्या विरोधात गेल्या निवडणुकीत केवळ 3611 मतांनी पराभूत झालेल्या माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांना मैदानात उतरवले होते. गेली साडेचार पाच वर्ष काळे यांनी मतदारसंघात सरकार विरोधात प्रचार करत शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर आंदोलन केली होती. संघर्ष यात्रा, यल्गार यात्रेच्या माध्यमातून त्यांनी बेरोजगारी, शेतकऱ्यांची फसवी कर्जमाफी आदी मुद्यांवरून बागडे यांच्या विरोधात रान पेटवले होते.

पण मतदारांनी नानांच्या विकासाला पंसती दशर्वत पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्‍वास दाखवला. हरिभाऊ बागडे यांना 105655 तर कल्याण काळे यांना 90539 मते मिळाली. बागडे यांनी कल्याण काळे यांचा 15116 मतांनी पराभव केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com