fuel hike rajdas athwale doing joke | Sarkarnama

इंधन दरवाढीचा त्रास होत नाही, कारण मी मंत्री, पेट्रोल-डिझेल फुकट मिळते: रामदास आठवले 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 16 सप्टेंबर 2018

मुंबई : ""इंधन दरवाढीचा मला काहीही त्रास होत नाही. कारण मी मंत्री आहे. मला फुकटात पेट्रोल-डिझेल मिळते,'' अशा भाषेत केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांनी इंधन दरवाढीचे समर्थन केले आहे. त्यांच्या या विधानाने तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. 

मुंबई : ""इंधन दरवाढीचा मला काहीही त्रास होत नाही. कारण मी मंत्री आहे. मला फुकटात पेट्रोल-डिझेल मिळते,'' अशा भाषेत केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांनी इंधन दरवाढीचे समर्थन केले आहे. त्यांच्या या विधानाने तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. 

पेट्रोल, डिझेलचे वाढते दर, त्यामुळे महागाईत पडत असलेली भर यामुळे सर्वसामान्य भारतीयांचे कंबरडे मोडले आहे. दिवसेंदिवस महागाईचा हा भार सहन करणे अवघड होत चालले आहे. देशाची अर्थव्यवस्थाही या भाववाढीमुळे दोलायमान झाल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत या अत्यंत संवेदनशील विषयावर एखाद्या केंद्रीय मंत्र्याची प्रतिक्रिया काय असावी? साहजिकच गांभीर्याने त्याकडे पाहावे अशी सर्वांचीच अपेक्षा असणार; परंतु नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांच्यालेखी हा विषय केवळ विनोदाचा असल्याचे दिसून आले. 

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने आपणास काही "परेशानी' होते का, असा प्रश्‍न त्यांना एका पत्रकार परिषदेत विचारण्यात आला होता. त्यावर आठवले यांनी हे उत्तर दिले. हे उत्तर ऐकून त्या पत्रकार परिषदेत हशा पिकला; मात्र इंधन दरवाढीच्या रोजच बसणाऱ्या धक्‍क्‍याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी आपल्या सन्माननीय मंत्र्यांचे हे उद्‌गार म्हणजे जखमेवरील मीठच ठरले. वृत्तवाहिन्या, तसेच समाजमाध्यमांतून त्यांचे हे विधान प्रसिद्ध होताच अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख