चंद्रकांत खैरेंना शाळकरी जीवनापासूनच बाळासाहेब ठाकरेंविषयी आकर्षण - रतनकुमार घोंगते

खंबीर साथ देणारा सच्चा दोस्तरतनकुमार घोंगते या आपल्या जिवलग मित्राबद्दल बोलतांना खासदार चंद्रकांतखैरे यांनी 'खंबीर साथ देणारा सच्चा दोस्त' असा त्यांचा उल्लेख केला.चंद्रकांत खैरे म्हणाले ,"आमची मैत्री जरी पन्नास वर्षांची असली तरी आमच्या चार पिढ्यांपासून हेमैत्रीचे धागे विणले गेलेले आहेत. रतन आणि माझी मुले हा मैत्रीचा वारसापुढे नेत आहेत याचा निश्‍चितच आनंद होतो. मी पहिल्यांदा जेव्हा आमदारम्हणून निवडून आलो तेव्हा रतन ने मला खांद्यावर उचलून घेतले होते. तोप्रसंग मला आजही आठवतो.एकमेकांशी असलेले घरगुती संबंध, एकमेकांच्यासुख-दुःखात सहभागी होण्यामुळे अनेकजण मला तेली समाजाचाच समजायचे. बालपणापासूनचीमैत्री आम्ही दोघांनी प्रामाणिकपणे जपली आहे, यापुढेही जपू. राजकारणात मीव्यस्त असलो तरी रतनचे आणि माझे बोलणे होत नाही असा एक दिवस जात नाही.रतनची आणि माझी मैत्री ही निस्वार्थ आहे. आमदार, खासदार, मंत्री झालो पणरतनने माझ्याकडून कधीच कुठली अपेक्षा केली नाही. मी स्वःताहून काहीदेण्याचा प्रयत्न केला तर मैत्रीत अंतर नको म्हणून त्याने नम्र नकार दिला. आमची ही दोस्ती कधीच तुटणार नाही. "
Khaire-Ghongte.
Khaire-Ghongte.

औरंगाबाद:" आठवी नववीत शिकत असतांना औरंगाबादमध्ये मार्मिक यायचे. खैरे यांना हे साप्ताहिक खूप आवडायचे. गुलमंडीवर अंक मिळाला नाही की मग आम्ही दोघे रेल्वेस्टेशनला बसने जायचो आणि मार्मिकचा अंक घेऊन यायचो. तेव्हापासून शिवसेना व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंबद्दल आकर्षण होते. त्यातूनच मग शिवसेनेची पहिली शाखा नवाबपुऱ्यात पृथ्वीराज पवार, ऍड. यादवराव वाघ, कै. लखन पहिलवान आणि आम्ही सुरु केली ",  औरंगाबादचे खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या आणि आपल्या पन्नास वर्षांपासूनच्या मैत्री बद्दल रतनकुमार घोंगते बोलत होते .  

तन कुमार घोंगते यांचे तेलाचे दुकान आहे आणि अन्य व्यवसाय आहेत  . मछली खडक येथे खासदार खैरे यांच्या घराजवळच घोंगते यांचे दुकान आणि घर आहे . शिवसेनेचे उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांचे आणि आमचा चार पिढ्यांचा शेजार  आहे आणि  घरोबा देखील आहे . पन्नास वर्षांपासून टिकून असलेल्या  निस्वार्थ व निखळ मैत्रीचा एक एक पदर ते उलगडून सांगत होते . धार्मिक आणि सामाजिक कार्याने आम्हाला एकत्र आणले, मैत्रीचा धागा विणला गेला .  परस्परांवरील विश्‍वासातून हे नाते  अतुट आणि घट्ट बनल्याचे घोंगते सांगतात. 

बालपणीच्या आठवणी सांगताना घोंगते  म्हणाले ," मछली खडकवरील घरात बालपण गेले. दिवाण देवडीच्या 'विन ऍन्ड कुल' शाळेतून दोघांनीही शिक्षणाचा श्रीगणेशा केला. पहिली ते चौथी शाळेत सोबत जायचो. खैरे आणि घोंगते या दोन परिवारांच्या घरात होती ती केवळ एक मातीची भिंत. त्यामुळे आम्ही वेगळे आहोत किंवा राहतो असे वाटलेच नाही. खिडकीतून आवाज दिला की आमची स्वारी खेळायला निघायची. चौथीनंतर आमची ताटातूट झाली, पण ती फक्त शाळेपुरती. खैरे चेलीपूरा हायस्कूलमध्ये तर मी मॉडेल मिडल शाळेत गेलो. दोन वर्षानंतर चंद्रकांत यांनी देखील माझ्याच शाळेत प्रवेश घेतला आणि पुन्हा आमची जोडी जमली.''

" त्याकाळी घरून आम्हा शालेय मुलांना पॉकेट मनी मिळत नसे . मग आम्ही एक शक्कल लढवली . सातवी-आठवीत असतांना चंद्रकांत खैरे आणि आणि मी दादासाहेब गणोरकर याचा 'लोकनेता' हा पेपर विकायचो. पाच पैसे किंमत असलेल्या पेपरचा गठ्ठा सायकलवर  घ्यायचा आणिमछली खडक सोडून शहागंज, किराण चावडी, सराफा भागात विकायचो. कमिशनच्या पैशातून भजी -जिलेबीवर ताव मारायचो .  एकदा भाऊंना(खैरे यांचे वडील) कळाले आणि त्यांनी खरडपट्टी करत पेपर वाटण्याचे काम बंद केले." 

" मी दहावीत नापास झालो, तर चंद्रकांत पास होऊन कॉलेजकुमार झाले. माझ्या शिक्षणाला पुर्णविराम मिळाला आणि वडीलांनी पारंपारिक तेलाचा व्यवसाय सांभाळायला सांगितला. मग आमची भेट कॉलेज संपल्यावरच व्हायची. आयटीआय आणि मराठी स्टेनोचा कोर्स पुर्ण केल्यावर खैरे डेक्कन फ्लोअर मील मध्ये सुपरवायजर म्हणून नोकरीला लागले. मी दुकान सांभाळायचो तर ते नोकरी करायचे, पण आमची सध्यांकाळची भेट ठरलेली असायची. कधी सकाळीच संगम हॉटेलमधील पोहे, जिलेबीचा नाष्टा करून आमच्या दिवसाची सुरुवात व्हायची."

राजकीय धावपळीतही मैत्री कायम 

" 1985-86 मध्ये चंद्रकांत खैरे शिवसेनेचे शहरप्रमुख झाले, 1988 च्या निवडणुकीत गुलमंडी वार्डातून नगरसेवक पदाची निवडणूक लढले. त्यांच्या प्रचाराची धुरा माझ्या खांद्यावरच होती. पोलिंग चीट वाटण्यापासून बुथ प्रतिनिधी म्हणून मी काम पाहिले. किराणचावडी वार्डातून नगरसेवकपदाची निवडणुक लढवण्याचा प्रस्ताव खैरे यांनी माझ्यापुढे ठेवला होता. पण राजकारण माझा पिंड नाही हे मी ओळखून त्यांना नम्रपणे नकार दिला. "

पुढेआमदार, मंत्री, खासदार असा खैरेचा राजकीय आलेख वाढत गेला तशा आमच्या भेटी कमी झाल्या, पण मैत्रीचा जिव्हाळा कायम आहे .  कधी प्रत्यक्ष तर कधी  फोनवरून आम्ही एकमेकांशी  बोलतो . अजूनही  खैरे घरी येतात  आणि सगळ्यांना भेटतात . त्यांचे राजकारण आमच्या मैत्रीच्या आड कधी आले नाही, " असे रतनकुमार  अभिमानाने सांगतात . 

" लहानपणापासूनच चंद्रकांत खैरे यांना धार्मिकतेची ओढ होती. नियमित देवदर्शन हा तेव्हाचा नित्यक्रम पन्नास वर्षानंतरही कायम आहे. राजूर येथील गणपतीवर त्यांची निस्सीम श्रध्दा आहे. 1974 पासून आजपर्यंत चतुर्थीचे दर्शन त्यांनी कधी चुकवल्याचे आठवत नाही. त्याचा मी साक्षीदारआहे. चंद्रकांत, पुंड आणि मी आम्ही तिघे सुरुवातीपासून नियमीत राजूरेश्‍वराच्या दर्शनाला जायचो.'

"पुंड यांचे निधन झाल्यानंतर आम्ही दोघेच कधी बस, टेम्पो, ट्रक, रेल्वेने राजूरला जायचो. डेक्कनमध्ये नोकरी लागल्यावर चंद्रकांत यांनी आल्वीन पुष्पक स्कूटर घेतली. मग याच स्कूटरवरून आम्ही अनेक वर्ष राजूरेश्‍वराचे दर्शन घेतले. राजूरचा हा प्रवास स्कूटरवरून लाल दिव्याच्या गाडीने कधी झाला हे कळलेच नाही. आजही दिल्ली, मुंबईहून चतुर्थीच्या दिवशी खैरे औरंगाबादमध्ये येतात तेव्हा राजूरला जातांना मला आवर्जून सोबत घेतात. धार्मिक कार्यात तसेच गरजूंना मदत करण्याची त्यांची वृत्ती वाखणण्याजोगी आहे." 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com