#FriendshipDay तेरे जैसा यार कहा.... 

नांदेड म्हटले की राजकारणात सर्वांना आठवतात ते ज्येष्ठ नेते शंकरराव चव्हाण आणि त्यांचे पुत्र अशोक चव्हाण. या पिता पुत्रांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद एकदा नव्हे तर दोनदा मिळविण्याचा बहुमानही मिळवलाय. राजकारणात राहूनही दोघांनीही मैत्री जपली आणि त्याचे अनेकजण उदाहरणे आणि दाखलेही देत असतात. त्यापैकीच एक डी. पी. सावंत.....
Ashok Chavan and DP Sawant
Ashok Chavan and DP Sawant

र्ष १९७६ .....स्थळ - मुंबईतील चौपाटी येथील भवन्स कॉलेज.....बारावीनंतर महाविद्यालयात प्रथम वर्षाला प्रवेश घेतलेले दोघेजण समोरासमोर आले आणि ओळख झाली. अोळखीचे रुपांतर मैत्रीत झाले आणि आजतागायत तब्बल ४२ वर्ष होत आले तरीही ही मैत्री अशीच टिकून आहे.....आणि यापुढेही राहणार आहे...एवढा मित्रावर दृढ विश्वास..... त्यातूनच मग मित्राबद्दलची मैत्री दिनाबद्दलची ओळ त्यांच्या तोंडी येते ती.....तेरे जैसा यार कहा....ही गोष्ट एखाद्या सिनेमातील वाटावी अशीच आहे आणि हे दोन दोस्त आहेत.....अशोक चव्हाण आणि डी. पी. सावंत..... 

नांदेड म्हटले की राजकारणात सर्वांना आठवतात ते ज्येष्ठ नेते शंकरराव चव्हाण आणि त्यांचे पुत्र अशोक चव्हाण. या पिता पुत्रांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद एकदा नव्हे तर दोनदा मिळविण्याचा बहुमानही मिळवलाय. राजकारणात राहूनही दोघांनीही मैत्री जपली आणि त्याचे अनेकजण उदाहरणे आणि दाखलेही देत असतात. त्यापैकीच एक डी. पी. सावंत..... 

डी. पी. सावंत हे मूळचे कोकणातील पण त्यांचा जन्म आणि शिक्षण मुंबईत झाले. मुंबईत १९७६ मध्ये भवन्स कॉलेजमध्ये अशोक चव्हाण, डी. पी. सावंत, महेश मांजरेकर, सुरेश गर्जे असे सर्व मित्र शिकण्याच्या निमित्ताने एकत्र आले आणि एकमेकांचे चांगले मित्र बनले. अशोक चव्हाण शिक्षण झाल्यानंतर नांदेडला आले आणि काही दिवसानंतर त्यांचे मित्र डी. पी. सावंतही नांदेडला १९८२ मध्ये आले. मित्राला मदत म्हणून त्यांनी तेव्हापासून सुरु केलेले काम आजही अव्याहतपणे सुरुच आहे. श्री. सावंत हे सुरवातीला लायन्स क्लब, साई सेवा ट्रस्ट आदींच्या माध्यमातून काम पाहत होते. नंतर १९९८ मध्ये त्यांच्यावर श्री शारदा भवन शिक्षण संस्थेच्या सचिवपदाची जबाबदारी येऊन पडली. त्यानंतर त्यांनी लातूर पॅटर्न लक्षात घेऊन नांदेडला शैक्षणिक क्षेत्रात चांगल्या पद्धतीने वातावरण निर्मिती करून नांदेड पॅटर्न उभा करण्यास पुढाकार घेतला.
 
दरम्यानच्या काळात २००८ मध्ये अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्यावरील जबाबदारी वाढली. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत नांदेड उत्तरमधून डी. पी. सावंत यांनी कॉंग्रेसकडून निवडणुक लढविली आणि सावंत आमदार झाले. त्यानंतर पुन्हा अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले. मात्र वर्षभरानंतर आदर्श प्रकरणामुळे श्री. चव्हाण यांना राजीनामा द्यावा लागला आणि त्यावेळी सावंत यांच्यावर राज्यमंत्रीपदाची जबाबदारी आली. नांदेडचे पालकमंत्री आणि उच्च, तंत्र व वैद्यकीय शिक्षण खाते त्यांनी २०१० मध्ये सांभाळले. त्यावेळी देखील त्यांनी माझी भूमिका ही भरताची असून राम म्हणजेच अशोकराव माझ्यासाठी सर्वकाही आहेत, हे भाषणात आवर्जून सांगितले होते. 

२०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोदी लाट असताना देखील अशोक चव्हाण खासदार झाले आणि डी. पी. सावंत हे आमदार म्हणून निवडून आले. आजही नांदेडच्या विकासासाठी दोघेही जण तेवढ्याच जोमात आणि खांद्याला खांदा लाऊन काम करत आहेत. त्यांच्यासोबत श्री. चव्हाण यांचे लहानपणापासूनचे मित्र आमदार अमर राजूरकर तसेच अशोक चव्हाण यांच्या पत्नी आमदार अमिता चव्हाण त्यांना समर्थ साथ देत आहेत.

सावंत मैत्री दिनाच्या निमित्ताने चव्हाण यांच्याबाबत बोलताना म्हणाले की, १९७६ पासूनची आमची मैत्री आजही तितकीच दृढ असून त्यांच्याबाबत किती आणि काय काय सांगावे हे कठीण आहे. खूप प्रसंग आणि अनुभव आहेत पण आमचे मित्र कधीच डगमगले नाहीत. मित्राबाबतच एवढच म्हणेन की ही दोस्ती तुटायची नाय.....आणि तेरे जैसा यार कहा....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com