राज्यातील सर्व चित्रपटगृहांत 'उरी' चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण ; संभाजी पाटील-निलंगेकर यांची माहिती

युवकांमध्ये सैन्याप्रती, देशाप्रती कर्तव्याची आणि अभिमानाची भावना जागृत व्हावी म्हणून कारगिल विजयदिनी (ता. २६) राज्यातील सर्व चित्रपटगृहात 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण होणार आहे. कौशल्य विकास व माजी सैनिक कल्याणमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली.
राज्यातील सर्व चित्रपटगृहांत 'उरी' चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण  ; संभाजी पाटील-निलंगेकर यांची माहिती

लातूर : युवकांमध्ये सैन्याप्रती, देशाप्रती कर्तव्याची आणि अभिमानाची भावना जागृत व्हावी म्हणून कारगिल विजयदिनी (ता. २६) राज्यातील सर्व चित्रपटगृहात 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण होणार आहे. कौशल्य विकास व माजी सैनिक कल्याणमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली.

देशभरात २६ जुलै हा दिवस कारगिल विजय दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधत राज्यातील युवकांमध्ये सैन्याप्रति कर्तव्याची भावना वृध्दींगत व्हावी याकरीता राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यातील चित्रपटागृहात 'उरी: द सर्जिकल स्ट्राईक' दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. १८ ते २५ वर्षातील तरुणांसाठी सकाळी दहा वाजता या चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण होणार आहे. राष्ट्र कर्तव्याची भावना तरुणाच्या मनी निर्माण करण्याचा उद्देश आहे. यास चित्रपट वितरक, सिनेमागृह मालक, चित्रपट संघटनांनी देशप्रती असलेले हे कार्य मानून या निर्णयास सहमती दिली आहे, असे निलंगेकर यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे नियोजन प्रत्येक जिल्हातील जिल्हाधिकारींच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. याचे यशस्वी आयोजन करण्याकरीता पूर्वतयारी म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक जिल्हयातील सर्व चित्रपटगृह चालक आणि महाविद्यालयांचे प्राचार्य यांची बैठक आयोजित करावी, अशा सूचनाही निलंगेकर यांनी बैठकीत दिल्या आहे. याबाबतचे परिपत्रक शासनाव्दारे सर्व जिल्हाधिकारी कार्यालयास तातडीने पाठविण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com