कांदा दर कोसळल्याने सरकारला श्रध्दांजली वाहून संभाजी ब्रिगेडचे नाशिकमध्ये मोफत कांदा वाटप

कांदा आणि टोमॅटोला सरकार हमीभाव देत नाही. किरकोळ स्वरुपाचा शासकीय भाव देत मलमपट्टी लावण्याचे काम केले जात आहे. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ लावण्यासारखा हा प्रकार आहे असा आरोप संभाजी ब्रिगेडतर्फे करण्यात आला.
 कांदा दर कोसळल्याने सरकारला श्रध्दांजली वाहून संभाजी ब्रिगेडचे नाशिकमध्ये मोफत कांदा वाटप

नाशिक : कांदा दर कोसळल्याने जिल्ह्यात विविध राजकीय पक्षांची आंदोलने सुरु आहेत. संभाजी ब्रिगेडने आज शहरात आंदोलन केले. पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देत सरकारला श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी नागरिकांना मोफत कांदा वाटप करण्यात आले. संभाजी ब्रिगेडतर्फे "नरेंद्र मोदी किसान विरोधी', "देवेंद्र फडणवीस होश में आओ' सारख्या घोषणा देत केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. कांदा पिकाला हमीभाव देत नसल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. या प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यासाठी परिसरातील नागरिकांना मोफत कांदा वाटप करण्यात आले. यावेळी चक्क कृषी राज्यमंत्र्यांना व सरकारला श्रद्घांजली वाहण्यात आली. 

कांदा आणि टोमॅटोला सरकार हमीभाव देत नाही. किरकोळ स्वरुपाचा शासकीय भाव देत मलमपट्टी लावण्याचे काम केले जात आहे. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ लावण्यासारखा हा प्रकार आहे असा आरोप संभाजी ब्रिगेडतर्फे करण्यात आला. शहराच्या मध्यवस्तीतील आणि वर्दळीच्या मेनरोडवरील बाजारपेठेत गाडगे महाराज पुतळा चौकात मोफत कांदा वाटप केले. त्यावेळी मोठी गर्दी झाली होती. यावेळी जिल्हा अध्यक्ष स्वप्निल इंगळे, सचिव नितीन रोटे पाटील, महानगरप्रमुख प्रफुल्ल वाघ, विकी गायधनी, अजय मराठे, गणेश सहाणे, शुभम भावसार, युवराज पवार, राहुल वाघ, जय दाते, जितेंद्र चव्हाण, विपुल धवण आदी युवक आंदोलनात सहभागी झाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com