चंद्रकांतदादांकडून पुरग्रस्तभागात दोन हजार गणेशमूर्ती मोफत 

 चंद्रकांतदादांकडून पुरग्रस्तभागात दोन हजार गणेशमूर्ती मोफत 

मुंबई : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यातील पूरबाधित कुटुंबीयांना दोन हजार गणेश मूर्ती मोफत उपलब्ध करून देण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती त्याप्रमाणे पेण येथून दोन हजार गणेशमूर्ती आणि एक हजार पूजेचे साहित्य त्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले. 

अतिवृष्टी आणि महापुरामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले होते. गणेशोत्सव तोंडावर असताना आलेल्या महापूरामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील गणेश मूर्तीकारांचेही मोठे नुकसान झाले होते. स्थानिक मूर्तीकारांनी बनविलेल्या सर्वच्या सर्व गणेशमूर्ती पुरात वाहून गेल्या. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव साजरा कसा करावा ? असा प्रश्न जिल्ह्यातील गणेश भक्तांसमोर निर्माण झाला होता. गणेश मूर्तीकारांनी आपली ही व्यथा पाटील यांच्या समोर मांडली. 

या समस्येची गंभीर दखल घेत चंद्रकांतदादा पाटील यांनी पूरबाधित कुटुंबीयांना 2000हजार गणेश मूर्ती मोफत उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार पेण येथून 2000गणेशमूर्ती आणि 1000पूजेचे साहित्य मंत्री पाटील यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आल्या. 

कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाडमध्ये गणेशोत्सवाची मोठी परंपरा आहे. येथील मशिदींमध्ये गणेशोत्सव काळात गणपती मूर्ती स्थापन करण्याची परंपरा शंभरहून अधिक वर्षांपासून सुरू आहे. शहरातील तब्बल सात मशिदींमध्ये हा गणेशोत्सव साजरा केला जातो.

या सर्व मशिदींचा परिसर हिंदू-मुस्लिम मिश्र लोकसंख्येचा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील हे नागरिक अत्यंत सलोख्याने हे दोन्ही धर्माचे सण एकत्रितरीत्या साजरे करतात. मात्र यावर्षी कोल्हापुरात महापूर आल्याने येथील कुंभार समाजातील बांधवानी बनवलेल्या गणेश मूर्ती पाण्यात वाहून गेल्या. 

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे पूरग्रस्त भागाच्या दौरयावर असताना कुरुंदवाड येथील कुंभार समाजातील बांधवांनी आपल्या समस्या दादांसमोर मांडल्या. यावेळी पाटील यांनी गणेश मूर्ती उपलब्ध करून देण्याचे आश्वस्त केले होते.

त्यानुसार पाटील यांनी लाड यांच्या सहकार्याने पेण येथून दोन हजार गणेश मूर्ती नागरिकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. यापैकी कुरुंदवाडमध्ये 500, सांगलीत एक हजार आणि इचलकरंजीमध्ये पाचशे गणेशमूर्ती उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच एक हजार घरगुती गणपतीचे पूजेच्या साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com