fraud in satara dcc bank | Sarkarnama

जिल्हा बॅंकेतील अपहारामुळे संचालक अस्वस्थ 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 22 मार्च 2017

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या कऱ्हाड तालुक्‍यातील म्हासोली येथील शाखेत दोन कोटी 28 लाख 34 हजारांच्या अपहार झाला आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे बॅंकेचे संचालक अस्वस्थ झाले आहेत. 

कऱ्हाड : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या कऱ्हाड तालुक्‍यातील म्हासोली येथील शाखेत दोन कोटी 28 लाख 34 हजारांच्या अपहार झाला आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे बॅंकेचे संचालक अस्वस्थ झाले आहेत. 

जिल्हा बॅंकेच्या म्हासोली येथील शाखेचे व्यवस्थापक निवृत्ती बबन भालेराव (रा. बनवडी) व कॅशिअर प्रमोद चंद्रोजी पाटील (रा. उंडाळे) यांनी तीन वर्षांत सुमारे दोन
कोटी 28 लाख 34 हजारांचा अपहार करून खातेदारांची रक्कम हडप केल्याचे उघड झाले आहे. ही बाब निदर्शनास आल्यानंतर बॅंकेचे सरव्यवस्थापक संजयकुमार
जाधव यांनी तालुका पोलिसांत तक्रार दिली. जिल्हा बॅंकेतील शाखेतील गैरव्यवहाराचा हा मोठा प्रकार असल्याचे संचालकांसह अधिकाऱ्यांत अस्वस्थता पसरली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख

टॅग्स