ओबीसी-आदिवासी शिष्यवृत्त्यांमधील घोटाळा उघडकीस आल्याने खळबळ

सन 2010 ते 2016 या कालावधीत शिष्यवृत्तीत मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने फडणवीस सरकारवर केला होता. विधिमंडळातही या प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती. या पार्श्‍वभूमीवर नेमेलेल्या चौकशी समितीत अनेक धक्‍कादायक गोष्टी समोर आल्या आहेत
fraud detected in OBC Scholarships
fraud detected in OBC Scholarships

मुंबई : राज्यातील ओबीसी आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत शिक्षण संस्थाचालकांनी सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरुन हजारो कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची बाब उघडकीस आल्याने खळबळ शिक्षण क्षेत्रात उडाली आहे.

सन २०१०  ते २०१६  या कालावधीत शिष्यवृत्तीत मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने फडणवीस सरकारवर केला होता. विधिमंडळातही या प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती. या पार्श्‍वभूमीवर नेमेलेल्या चौकशी समितीत अनेक धक्‍कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.

समाजकल्याण आणि आदिवासी विभागाकडून देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीमध्ये २१०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे तीन आयपीएस अधिकाऱ्यांच्या चौकशी समितीने नमूद केले आहे. विशेष म्हणजे २१०० कोटी रुपयांचा हा गैरव्यवहार समाजकल्याण विभागातील १३ टक्के संस्था आणि आदिवासी विकास विभागातील १५  टक्के संस्थांच्या लेखापरीक्षणातून समोर आला आहे. उरलेल्या संस्थांची चौकशी केल्यास आणखी मोठा घोटाळा उघड होऊ शकतो असे या चौकशी समितीने म्हटले आहे. तसेच या प्रकरणाची सीआयडी किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे चौकशी करण्याची शिफारस राज्य सरकारकडे केली आहे. तीन आयपीएस अधिकाऱ्यांच्या चौकशी समितीमध्ये  के. वेंकटेशम, रणजितसिंग देओल आणि पियुष सिंह यांचा समावेश आहे.

चौकशीतून आढळून आलेला भ्रष्टाचार

१. समाजकल्याण विभागाची सहाय्यक आयुक्त कार्यालये - १५३६ कोटी ३३ लाख २९ हजार ६८८ रुपये
२. आदिवासी विभाग विभागातील प्रकल्प अधिकारी कार्यालयं - १२२ कोटी ९७ लाख ९९ हजार ४६७  रुपये
३. समाज कल्याण विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या १३९२ संस्था - ३७३ कोटी ८७ लाख  हजार १४२  रुपये
४. एकात्मिक आदिवासी प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या १६६३ संस्था - ५८  कोटी १५ लाख ७० हजार १५९ 
५. ठाणे, नागपूर आणि नाशिक विभागांच्या अंतर्गत येणाऱ्या १६३ संस्थांचे सहकार विभागाने केलेले लेखा परीक्षण - ९ कोटी ९४ लाख ३४ हजार १९३ रुपये

कारवाई होणार : विजय वडेट्टीवार

राज्याचे बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी २१०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे मान्य केले आहे. त्याचबरोबर या प्रकरणात होत असलेल्या गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर असतानाच सुरुवात झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणात ज्या ७० शैक्षणिक संस्थांवर कारवाईची शिफारस चौकशी समितीने केली आहे, त्यावर कारवाई करु, असे आश्वासन विजय वडेट्टीवार यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com