Fraud of 2 crores 70 lacks In Bhusaval | Sarkarnama

दोन कोटी 70 लाखांचा अपहार, बढेसर पतसंस्थेच्या 11 कर्जदारांवर गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

पावणेतीन कोटींचे कर्ज घेऊन सतरा वर्षे परतफेड नसल्याचा आरोप .कर्ज घेताना पुरेसे तारणही दिले नाही. काहींनी कागदपत्रांची पूर्तताही केली नाही व कर्जफेडही केली नाही. 30 मार्च 2000 पासून 27 एप्रिल 2017 पर्यंतच्या कालावधीत हा प्रकार घडला.

भुसावळ:  शहरातील चंद्रकांत हरी बढेसर पतसंस्थेची दोन कोटी 70 लाखांत फसवणूक केल्याप्रकरणी अकरा संशयितांविरुद्ध शहर पोलिसात  गुन्हा दाखल झाला. संशयितांमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, व्यावसायिक, वेंडर आदींचा समावेश असून, त्यांनी 17 वर्षांपासून घेतलेल्या कर्जाची परतफेड केलेली नाही. म्हणून तत्कालीन लेखा परीक्षकांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे संशयित म्हणून गुन्हा दाखल केलेले माजी जिल्हा परिषद सदस्य गोकूळ मोरे हे मृत झाले आहेत. 

पोलिस सूत्रांनुसार भुसावळ शहरातील सहकारनगर येथील बढेसर पतसंस्थेतून संशयित गोकूळ नारायण मोरे (मृत) (रा. कंडारी), शैलेंद्र प्रल्हाद नन्नवरे (रा. अनिलनगर, भुसावळ), सुरेश राजाराम पोतदार (रा. जळगाव नाका, भुसावळ), किशोर ज्ञानदेव चौधरी (रा. प्रभात कॉलनी, भुसावळ), वसंतराव गोंडू झारखंडे (रा. वराडसीम), राहुल देविदास चौधरी (रा. वरणगाव रोड, भुसावळ), संजीव देविदास चौधरी (रा. म्युनिसिपल पार्क, भुसावळ), वर्षाबाई जयपाल कुकरेजा (रा. महेशनगर, भुसावळ), देवीबाई हरीकुमार कुकरेजा (रा. महेशनगर, भुसावळ), मधुकर शिवाजी उगले (रा. टिंबर मार्केट, भुसावळ), राजू बुधोमल शर्मा (रा. भुसावळ) यांनी 2 कोटी 70 लाख 51 हजार 298 रुपयांचे कर्ज घेतले.

 कर्ज घेताना पुरेसे तारणही दिले नाही. काहींनी कागदपत्रांची पूर्तताही केली नाही व कर्जफेडही केली नाही. 30 मार्च 2000 पासून 27 एप्रिल 2017 पर्यंतच्या कालावधीत हा प्रकार घडला. या कर्जदारांमुळे ठेवीदारांना मुदतीत ठेवीची परतफेड करण्यासाठी चंद्रकांत हरी बढेसर पतसंस्था असमर्थ ठरली. या कारणावरून तत्कालीन लेखा परीक्षक योगीराजसिंग राजपूत यांनी शहर पोलिसात आज फिर्याद दाखल केली आहे. तपास पोलिस निरीक्षक वसंत मोरे हे करीत आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख