साताऱ्यात चौथा कोरोना बाधित रूग्ण सापडला

सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या यादीनुसार मरकज काळात दिल्ली येथे भेट दिल्याने सातारा जिल्ह्यातील 25 ते 27 वयोगटातील चार युवकांना आज पाच एप्रिल रोजी कोविड- 19 संशयित म्हणून जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
साताऱ्यात चौथा कोरोना बाधित रूग्ण सापडला

सातारा : कोरोना संशयित म्हणून काल (शनिवारी) जिल्हा रूग्णालयात दाखल झालेल्या साताऱ्यातील ग्रामीण भागातील 54 वर्षीय नागरिक कोरोना (कोव्हीड -19) पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.

त्यामुळे सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या चार झाली आहे. आज साताऱ्यात चार व कऱ्हाड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये सात असे अकरा रूग्ण कोरोना संशयित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल झाले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली आहे.

दरम्यान, काल कऱ्हाडतील दोन संशयित व श्‍वसन संस्थेतील संसर्गामुळे मृत झालेल्या बालिकेचा रिपोर्टही निगेटिव्ह आला आहे. तसेच साताऱ्यातील 31 वर्षीय युवकाचा रिपोर्टही निगेटिव्ह आल्याचा अहवाल पुणे एनआयव्ही संस्थेने दिला आहे.

आज कोरोना बाधित असल्याचा रिपोर्ट आलेली 54 वर्षीय व्यक्ती ही साताऱ्यातील ग्रामीण भागातील असून वाळकेश्वर (मुंबई) येथे मागील 14 वर्षापासून खाजगी कारचालक म्हणून एकटाच राहत होता. 

आठ मार्च रोजी टेम्पोने तो गावी आला होता. दोन दिवसांपूर्वी त्याला ताप व सर्दी, खोकल्याचा त्रास होऊ लागेल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता.

त्यास मधूमेहाचा त्रास असून त्यावर उपचार चालू आहेत. सद्यस्थितीत त्याची प्रकृती स्थिर असुन त्यावर मार्गदर्शक सुचनानुसार कोरोना संसर्गाचे उपचार चालू आहेत. या कोराना बाधित रुग्णाच्या संपर्कातील सर्व निकट सहवासितांची माहिती घेऊन तपासणी करण्यात येणार आहे.

कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे एक ते 85 वयोगटातील पाच पुरुष व एक महिला अशा सहा नागरिकांना श्वसन संस्थेच्या तीव्र जंतूसंसर्गामुळे विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.

यातील 30 वर्षाचा पुरुषाचा कोरोना बाधित रुग्णांचा निकट सहवासित असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच परदेश प्रवास करुन आलेल्या एका 67 वर्षीय पुरुषास देखील विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. या सर्व 11 नागरिकांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एनआयव्ही पुणे येथे पाठविण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

दरम्यान, सध्या विलगीकरण कक्षात सुरवातीला दाखल झालेल्या दोन कोरोना बाधित रुग्णांच्या घशातील स्त्रावांचे नमुने 14 दिवस पूर्ण झाल्याने तपासणीसाठी एनआयव्ही पुणे येथे पाठविण्यात आले आहेत, असेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com