संगमनेरकरांसाठी आणखी एक 'बाॅम्ब'; परराज्यांतील १४ लोकांना मशिदीत लपविले

संगमनेर शहर व तालुक्यात चार जण कोरोना बाधीत असल्याचे उघड झाल्यानंतर शहरातील एका मशिदीमध्ये नेपाळसह परराज्यातील १४ जणांना लपविल्याची दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे
Fourteen People Found in Masjid at Sangamner
Fourteen People Found in Masjid at Sangamner

संगमनेर : संगमनेर शहर व तालुक्यात चार जण कोरोना बाधीत असल्याचे उघड झाल्यानंतर शहरातील एका मशिदीमध्ये नेपाळसह परराज्यांतील १४ जणांना लपविल्याची दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.  या प्रकरणी या नागरिकांच्या जेवण व निवासाची व्यवस्था करणाऱ्या तबलिग समाजाचे मर्कज मशिद मोमिनपुराचे ट्रस्टी असलेल्या पाच जणांविरुध्द काल (गुरुवारी) रात्री उशिरा संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

जलीमखान कासमखान पठाण, शेख जियाऊद्दीन आमीन, जैनुद्दीन हुसेन परावे, हाजी इमाम जैनुद्दिन मोमीन, रिजवान गुलामनबी मोमिन (सर्व रा. मोमीनपुरा, संगमनेर) अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत.  शहराच्या नगररोड परिसरातील नाटकी नाल्याजवळील इस्लामपुरा मशिदित नेपाळ येथील परदेशी नागरिकांसह परराज्यातील एकून १४ तबलीग जमातीचे लोक एका मशिदीत असल्याचे पोलिसांना समजले. कोरोनामुळे जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत प्रशासनाची नजर चुकवून या १४ जणांना मशिद व रहेमतनगर गल्ली क्रमांक २ येथील एका घरात आसरा देण्यात आल्याची बाब पोलिस निरिक्षक अभय परमार यांना समजल्याने त्यांनी पुढील सूत्रे हलविली. 

त्यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (ता. १)गोपनीय शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या पहाणीत रहेमतनगरच्या गल्ली क्रमांक २, डोंगरे मळा परिसरातील अमजद इब्राहिम शेख यांच्या तिसऱ्या मजल्यावरील दोन फ्लॅटमध्ये परराज्यांतील १४ नागरिक अनधिकृतरित्या वास्तव्यास असल्याची बाब उघडकीला आली. त्यानुसार पोलिसांनी स्थानिक मशिदीच्या ट्रस्टींवर गुन्हे दाखल करून सर्व चाैदा जणांना तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. हे सर्व नेपाळ, बिहार येथील आहेत. या सर्वांची रात्री उशिरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. संदिप कचेरीया यांनी तपासणी करुन त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारले आहेत.

या प्रकरणी पोलिस नाईक सलिम रमजान शेख यांच्या फिर्यादीवरुन संगमनेर शहर पोलिस ठाण्यात शासनाने कोरोना प्रतिबंधासाठी केलेल्या नियमाची जाणीवपूर्वक अवज्ञा करुन, कोरोना विषाणू संसर्ग पसरण्यासाठी हयगयीचे कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. संगमनेरवर कोरोनाचे संकट घोंघावत असताना, प्रशासनास माहिती न देता परदेशी नागरिकांना धार्मिक स्थळ व घरात आश्रय का देण्यात आला, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com