दिल्लीतून आलेले १४ संशयित पिंपरीत महापालिका रुग्णालयात दाखल; १८ जणांचा शोध सुरू

दिल्लीच्या निजामुद्दीन भागात काही दिवसांपूर्वी झालेल्या एका मोठ्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणे दिसू लागली आहेत. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल बत्तीस नागरिक सहभागी झाले होते
Fourteen Delhi Returned Admitted in Pimpri Hospital
Fourteen Delhi Returned Admitted in Pimpri Hospital

पिंपरी : दिल्लीच्या निजामुद्दीन भागात काही दिवसांपूर्वी झालेल्या एका मोठ्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणे दिसू लागली आहेत. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल बत्तीस नागरिक सहभागी झाले होते. त्यापैकी चौदा जणांचा महापालिकेने शोध घेतला असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने उद्या  ‘एनआयव्हीकडे’ तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.  

दरम्यान, हे नागरिक शहरात येवून पंधरा दिवस उलटून गेले. त्यामुळे किती जणांच्या हे संपर्कात आले असतील हे सांगणे कठीण आहे. आणखी अठरा नागरिकांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. दिल्लीमधील निजामुद्दीन परिसरात तबलिगी जमात या संघटनेच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यक्रम एक ते पंधरा मार्च या कालावधीत पार पडला. कार्यक्रमासाठी भारताच्या विविध भागातून तसेच विदेशातून देखील मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. 

हजारो लोक हे निजामुद्दीनमधील दर्ग्यामधील तबलीगी जमातच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. त्यात परदेशातून आलेल्यांची संख्या देखील मोठी होती. कार्यक्रमातील काही जण हे आधीच कोरोनाबाधित होते. त्यातील काही लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे.  या कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या सहाजणांचा तेलंगणामध्ये मृत्यू झाला. त्यामुळे देशभर खळबळ उडाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com