Fourteen Candidates for Council Election | Sarkarnama

विधान परिषदेच्या मैदानात 14 उमेदवार; उद्या होणार लढतीचे चित्र स्पष्ट

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 16 जानेवारी 2020

विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशीपर्यंत 15 अर्ज दाखल झालेले होते. काल मंगळवारपर्यंत कोण, कुण्या पक्षाचा उमेदवार असेल, यावर चर्चा होती. आता नामांकन दाखल झाल्यानंतर कोण माघार घेणार, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत

यवतमाळ  : विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी काल मंगळवारी दाखल झालेल्या 15 उमेदवारी अर्जांची काल (ता.15) छाननी झाली. त्यात सतीश भोयर यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. त्यामुळे आता निवडणुकीच्या मैदानात एकूण 14 उमेदवार शिल्लक असले तरी अंतिम चित्र येत्या शुक्रवारी (ता.17) स्पष्ट होणार आहे.

विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशीपर्यंत 15 अर्ज दाखल झालेले होते. काल मंगळवारपर्यंत कोण, कुण्या पक्षाचा उमेदवार असेल, यावर चर्चा होती. आता नामांकन दाखल झाल्यानंतर कोण माघार घेणार, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. एकूण 15 उमेदवारी अर्ज असले तरीदेखील लढत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी होण्याची शक्‍यता आहे.

दाखल झालेल्या नामांकनानंतर  बुधवारी (ता.15) अर्जांची छाननी झाली. त्यात सतीश भोयर यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात अजूनही 14 उमेदवार कायम आहेत. दरम्यान, येत्या शुक्रवारी (ता.17) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस असून, त्यानंतर निवडणुकीतील चित्र स्पष्ट होणार आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख