उत्तर महाराष्ट्रात भाजपतर्फे सहापैकी चार जागावर महिला उमेदवार!

स्थानिक स्वराज्य संस्थामधे महिलांना पन्नास टक्के आरक्षण देण्यात आले आहे. मात्र, विधानसभा, लोकसभेत महिलांना अद्याप आरक्षण मिळालेले नाही. पण भाजपने उत्तर महाराष्ट्रात वाट्याला आलेल्या सहा जागांपैकी चार महिलांना उमेदवारी देऊन महिला मतदारांना भाजपकडे वळविण्याचा प्रयत्न केला आहे. तर तिकीट मिळविण्याच्या या स्पर्धेत पुरूष उमेदवारांना मागे टाकत महिलांनी आघाडी घेतली आहे.
Raksha Khadse - Smita Wagh-Heena Gavit-Bharati Pawar
Raksha Khadse - Smita Wagh-Heena Gavit-Bharati Pawar

भडगाव (जि.जळगाव)  : स्थानिक स्वराज्य संस्थामधे महिलांना पन्नास टक्के आरक्षण देण्यात आले आहे. मात्र, विधानसभा, लोकसभेत महिलांना अद्याप आरक्षण मिळालेले नाही. पण भाजपने उत्तर महाराष्ट्रात वाट्याला आलेल्या सहा जागांपैकी चार महिलांना उमेदवारी देऊन महिला मतदारांना भाजपकडे वळविण्याचा प्रयत्न केला आहे. तर तिकीट मिळविण्याच्या या स्पर्धेत पुरूष उमेदवारांना मागे टाकत महिलांनी आघाडी घेतली आहे.

पुरूष मतदारांच्या बरोबरीने महिला मतदारांची संख्या आहे. पण त्या तुलनेने महिलांना उमेदवारी मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थामधे महिलांना पन्नास टक्के आरक्षण देण्यात आले आहे. त्यानुसार लोकसभा,विधानसभेत ही महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळण्याची मागणी आहे. भाजपने उत्तर महाराष्ट्रात सहा पैकी चार जागावर महिला उमेदवरांना संधी दिली आहे. गेल्यावेळच्या तुलनेने दोन महिला उमेदवारांची संख्या वाढली आहे.

जळगावात दोन महिला उमेदवार
भारतीय जनता पक्षातर्फे खानदेशात नंदुरबारच्या खासदार हिना गावित व रावेर लोकसभा मतदार संघातील रक्षा खडसे खासदार आहेत. पक्षाने या दोघीना पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यात आता जळगाव लोकसभा मतदार संघातूनही विद्यमान आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता जळगाव जिल्ह्यातील दोन्ही मतदार संघात भाजपच्या महिला तर खानदेशात नंदुरबारच्या हिना गावितसह तीन महिला उमेदवार आहेत. उत्तर महाराष्ट्राचा विचार केल्यास दिंडोरीतून भाजपने 'राष्ट्रवादी'तून आलेल्या भारती पवार यांना उमेदवारी दिली आहे. उत्तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला सहा जागा आहेत,त्या पैकी चार महिला उमेदवार दिल्या आहेत. त्यामुळे भाजपने पन्नास टक्के नव्हेत तर त्यापेक्षा अधिक वाटा महिला उमेदवारांना दिला असल्याचे दिसून येत आहे.

भाजपच्या उमेदवारीत महिलांची बाजी
भाजपने उत्तर महाराष्ट्रात सहा पैकी चार जागांवर महिलांना उमेदवारी दिल्याने महिला मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. महिला उमेदवार असल्याने महिलांनाही आपलेसे वाटते. जळगाव जिल्ह्यात तर दोन्ही जागांवर महिलांना संधी देवून भाजपने नवा पायंडा पाडला आहे. महिला उमेदवारांना संधी हा प्रचाराचा चांगला मुद्दा होऊ शकतो. अर्थात प्रत्यक्षात मतदानावर त्याचा कीती फायदा होईल हे मतपेटीच सांगणार आहे. मात्र, तिकीट मिळविण्याच्या या स्पर्धेत महिलांनी मारलेली बाजी ही निश्‍चितच लढाई जिंकण्यापेक्षा कमी नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com