devendra fadanvis may retain four corporations in vidhrbha
devendra fadanvis may retain four corporations in vidhrbha

विदर्भातील महापालिकांत नवी समीकरणे अवघड; पुन्हा भाजपची सत्ता शक्य

चारही महापालिकांत भाजपकडे पुरेसे संख्याबळ असल्याने शिवसेना, काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष एकत्र येण्याचा प्रभाव विदर्भात दिसणे अवघड आहे.

नागपूर : विदर्भातील अमरावती, नागपूर, चंद्रपूर आणि अकोला चार महानगरपालिकेच्या महापौराची निवडून होऊ घातली आहे. या चारही महानगरपालिका भाजपच्या ताब्यात जाण्याची शक्‍यता आहे. येथे स्पष्ट बहुमत असल्याने महापौर निवडीचा भाजपचा मार्ग मोकळा झाला आहे.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भाजपकडून राखी कंचर्लावार, कॉंग्रेसकडून सुनीता लोढिया, कल्पना लहामगे, उपमहापौरपदासाठी भाजपकडून राहुल पावडे, कॉंग्रेसकडून प्रशांत दानव, अशोक नागापुरे, बसपचे अनिल रामटेके, राकॉंचे दीपक जयस्वाल यांनी नामांकन दाखल केले आहेत. महानगरपालिकेत एकूण 66 सदस्य आहेत. यात भाजप 33, कॉंग्रेस 13, बसप 6, राकॉं 2, सेना 2, मनसे 2 आणि अपक्ष 4 असे पक्षीय बलाबल आहे. शिवसेना, मनसे आणि अपक्ष अशा एकूण 41 सदस्यांसह भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे.

अमरावती महानगरपालिका भाजपकडून चेतन गावंडे यांची अमरावती महापालिकेच्या महापौरपदाकरिता तर कुसुम साहू यांची उपमहापौरासाठी नावे निश्‍चित करण्यात आली आहेत. दोन्ही पदांकरिता निवडणूक होणार असून ती औपचारिक ठरण्याची शक्‍यता आहे. सभागृहात भाजपकडे दोन्ही पदे जिंकता येऊ शकतील इतके बहूमत आहे. त्यामुळे चेतन गावंडे यांची महापौरपदी व कुसुम साहू यांची उपमहापौरपदाकरिता निवड सहज शक्‍य आहे.

 दरम्यान, कॉंग्रेसकडून माजी महापौर विलास इंगोले व प्रदीप हिवसे यांनी अर्ज दाखल केले आहेत. बसपकडून महापौरपदासाठी माला देवकर, एमआयएमकडून अब्दुल हुसेन मुबारक हुसेन यांनी आज अखेरच्या दिवशी अर्ज दाखल केलेत. उपमहापौरपदाकरिता कॉंग्रेसने अर्ज केलेला नाही. सेनेने डॉ. राजेंद्र तायडे, बसपकडून गटनेते चेतन पवार व इशरतबानो मन्नान खान, युवा स्वाभिमानकडून सुमती ढोके, तर एमआयएमकडून मो. साबीर मो. नासीर यांनी अर्ज दाखल केला आहे. 87 सदस्य असलेल्या सभागृहात भाजपकडे 45 व मित्रपक्षाचे चार, असे 49 सदस्य आहेत. युतीत सेना सहभागी असताना त्यांचे संख्याबळ 55 होते, तर कॉंग्रेसकडे 15, बसपकडे सहा, एमआयएमकडे 10 सदस्य आहेत.

अकोल्याचे महापौरपद सर्वसाधारण महिला राखीव झाले. त्यानंतर विभागीय आयुक्तांनी महापौर, उपमहापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार सोमवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले. या वेळेत भाजपकडून महापौरपदासाठी अर्चना मसने आणि अनुराधा नावकार आणि उपमहापौरपदासाठी राजेंद्र गिरी आणि दीपक मनवानी यांनी अर्ज सादर केले. कॉंग्रेसतर्फे महापौरपदासाठी अजराबी नसरीन आणि उपमहापौरपदासाठी पराग कांबळे यांनी अर्ज सादर केले. या दोन्ही पदासाठी आता शुक्रवार, 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता आयोजित सर्वसाधारण सभेत निवड होईल. या सभेला पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर राहणार आहेत. नागपूर महानगरपालिकेमध्ये संदीप जोशी यांनी अर्ज दाखल केला. येथे भाजपला स्पष्ट बहुमत आहे. तर उपमहापौरपदासाठी मनीष कोठे यांनी अर्ज दाखल केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com