नाशिक : चारही आमदारांना शिवसेनेची उमेदवारी, गावित, महालेंचाही समावेश

नाशिक जिल्ह्यातील चारही विद्यमान आमदारांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. याशिवाय काँग्रेस पक्षातून आलेल्या निर्मला गावित, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन आलेल्या धनराज महाले आणि जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांना शिवसेनेने उमेदवारीचे संकेत दिले आहेत. या सर्वांना सायंकाळी 'एबी फाॅर्म' मिळतील असे वरिष्ठ सुत्रांनी सांगीतले.
Yogesh Gholap - Dada Bhuse
Yogesh Gholap - Dada Bhuse

नाशिक :  जिल्ह्यातील चारही विद्यमान आमदारांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. याशिवाय काँग्रेस पक्षातून आलेल्या निर्मला गावित, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन आलेल्या धनराज महाले आणि जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांना शिवसेनेने उमेदवारीचे संकेत दिले आहेत. या सर्वांना सायंकाळी 'एबी फाॅर्म' मिळतील असे वरिष्ठ सुत्रांनी सांगीतले. 

भारतीय जनता पक्षाने अद्याप कोणालाही उमेदवारी जाहिर केलेली नाही. काँग्रेसने मालेगाव शहरातील आमदार आसीफ शेख वगळता अन्य नावे निश्चित केलेली नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची यादी अनिश्चित आहे. असे असतांना शिवसेनेने उमेदवारांच्या घोषणेत आघाडी घेतली आहे. 

        राजाभाऊ वाजे                 अनिल कदम

राज्यमंत्री दादा भुसे (मालेगाव बाह्य), राजाभाऊ वाजे (सिन्नर), अनिल कदम (निफाड) आणि योगेश घोलप (देवळाली) या चारही विद्यमान आमदारांना शिवसेनेने काल उमेदवारी जाहीर केली. त्यांना काल सायंकाळीच पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत 'एबी फाॅर्म' देण्यात आला. या सर्वांनी यापुर्वीच प्रचार सुरु केला आहे. याशिवाय इगतपुरी मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचा व आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केलेल्या निर्मला गावित यांनाही पक्षाने उमेदवारीचे संकेत दिले आहेत. 

       धनराज महाले         निर्मला गावित

दिंडोरी मतदारसंघातील धनराज महाले यांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा राजीनामा दिला होता. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करुन लोकसभेची उमेदवारी घेतली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर ते लगेचच स्वगृही परतले. त्यांमुळे त्यांना उमेदवारी मिळेल की नाही, अशी शंका होती. मात्र, त्यांनाही शिवसेना उमेदवारी देणार आहे. बहुचर्चीत नांदगाव मतदारसंघात पंकज भुजबळ यांच्या विरोधात शिवसेनेने वादग्रस्त जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांना उमेदवारी दिल्याचे कळते. या सर्वांना आज सायंकाळी 'एबी फाॅर्म' दिले जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com