कोल्हापुरात आणखी एक पॉझिटिव्ह; जिल्ह्याचा आकडा चार 

त्यांना न्युमोनियाची लक्षणे दिसत असल्याने तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले होते. सीपीआरच्या कोरोना तपासणी वेळी त्यांचा स्वॅब मिरजेच्या विषाणू परीक्षण प्रयोगशाळेकडे पाठविला होता.
four corona positive cases in kolhapur
four corona positive cases in kolhapur

कोल्हापूर : शहरात आज आणखी एकजण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. संबंधित महिला कसबा बावडा येथील आहे. आता जिल्ह्यातील रुग्णांची संख्या चार झाली असून त्यापैकी एकावर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्वरित दोघांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

आज आढळलेल्या महिलेच्या तपासणी स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर यंत्रणेने त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट केले. त्यांना न्युमोनियाची लक्षणे दिसत होती. आता त्यांच्यावर सीपीआरच्या नवीन कोरोना कक्षात उपचार सुरू आहेत. नऊ दिवसांपूर्वी शहरातील भक्तीपूजानगरमध्ये पुण्याहून आलेल्या पाहुण्या व्यक्तीला कोरोना असल्याचे आढळले होते. त्यानंतर प्रशासनाने हा परिसर सील केला होता. त्यानंतर संबंधित रुग्णाची जवळची नातेवाईकही पॉझिटिव्ह आढळली होती. या दोघांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे.

कसबा बावड्यातील महिलेला दोन दिवसांपूर्वी रूग्णालयात दाखल केले होते. त्या 15 दिवसांपूर्वी साताऱ्यावरून येथे आल्या होत्या. दोन दिवसापूर्वी त्यांना खोकला, ताप, घसा दुखी अशी लक्षणे दिसत होती. त्यानंतर त्या लाईन बझार येथील सेवा रूग्णालयात गेल्या होत्या. तेथे त्यांना न्युमोनियाची लक्षणे दिसत असल्याने तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले होते. सीपीआरच्या कोरोना तपासणी वेळी त्यांचा स्वॅब मिरजेच्या विषाणू परीक्षण प्रयोगशाळेकडे पाठविला होता. दरम्यान, सेवा रूग्णालयात त्या महिलेशी संपर्कात आल्येल्या कर्मचाऱ्यांचीही तपासणी व गरजेनुसार उपचार केले जाणार आहेत, असे सेवा रूग्णालयाचे अधिक्षक डॉ. उमेश कदम यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com