बलात्कार करून जाळणारे चौघेजण चकमकीत ठार : पोलिसांनी योग्य केले?

बलात्कारातील खुन्यांना अशा प्रकारे शिक्षा झाल्याने देशभर चर्चा!
four accused killed police encounter
four accused killed police encounter

हैदराबाद ः पशुवैद्यकीय तरुणीवर बलात्कार करून तिला जिवंत जाळणारे चार आरोपी पोलिस चमकमकीत ठार झाले. हैदराबादजवळ झालेल्या या घटनेने देशभरात खळबळ उडाली आहे. पोलिसांची ही कृती योग्य की अयोग्य यावर चर्चा सुरू झाल्या आहेत.

दहा दिवसांपूर्वी बलात्काराची घटना घडली होती. या तरुणीची गाडी पंक्चर झाल्याने तिला मदत करण्याच्या बहाण्याने या चार आरोपी तेथे पोहोचले होते. तिचे अपहरण करून तिला जाळल्याने देशभर संतापाची लाट उसळली होती. त्यातील चार आरोपींनी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आरोपींनी तात्काळ शिक्षा करण्याची मागणी होत होती.

या चार आरोपींनी घेऊन पोलिस पहाटे साडे तीनच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले. तपासात क्राईम सीन द्वारे पुरावे बळकट करण्यासाठी या आरोपींना नेण्यात आले होते. येथे पोलिसांचे शस्त्र हिसकावून घेऊन पळून जाण्याचा आरोपींनी प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना ठार करावे लागले, असे पोलिसांनी म्हटले आहे.  

या घटनेतील मुलांच्या वडिलांने या चकमकीचे स्वागत केले आणि माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल, अशी भावना व्यक्त केली. 

पोलिसांनी कायदा हातात घेण्याची काय गरज होती, असा सवाल आता विचारला जात आहे. पोलिसांनी हा खून केला आहे, अशीही प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. चकमकीच्या घटनास्थळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांकडे पाहून बसमधील तरुणींनी त्यांच्या नावाचा जयजयकार केला. सामान्य माणसानेही त्यांना ठार मारण्याचे कृतीचे कौतुक केले. मात्र मानवाधिकार कार्यकर्ते, कायदेतज्ञ यांनी अशा बाबींचा विरोध केला आहे. 

दिल्लीतील अशाच घटनेत बळी पडलेल्या निर्भयाचे मारेकरी अद्याप जिवंत आहेत. तिच्या आईनेही देशातील न्यायव्यवस्था सुधारण्याची गरज आजच्या घटनेनंतर व्यक्त

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com