हे चौघे 22 जानेवारी सकाळी सात वाजता फासावर जाणार!

...
nirbhaya case accused to be hang
nirbhaya case accused to be hang

नवी दिल्ली, ता.7 (पीटीआय) : केवळ देशच नाहीतर अवघे जग ज्यामुळे सुन्न झाले होते, त्या दिल्लीत 2012 साली घडलेल्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि खूनप्रकरणी आज येथील न्यायालयाने चारही नराधमांना फासावर लटकाविण्यासाठी "डेथ वॉरंट' जारी केले.

या चारही दोषींना तिहार तुरूंगात 22 जानेवारी रोजी सकाळी सात वाजता फाशी दिली जाईल. आता दोषींच्या हाती चौदा दिवसांचा अवधी असून या दरम्यान ते त्यांच्याकडील सर्वप्रकारचे कायदेशीर पर्याय अवलंबू शकतात असे न्यायालयाने म्हटले आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सतीशकुमार अरोरा यांनी दोषी मुकेश (वय 32), पवन गुप्ता (25), विनय शर्मा (26) आणि अक्षयकुमार सिंह (31) यांच्याविरोधात हे वॉरंट बजावले.

आज येथील न्यायालयामध्ये या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली असता सरकारी पक्षाकडून या खटल्याचे वेगवेगळे पैलू सादर करण्यात आले. या दोषींची कसलीही दया याचिका अथवा विनंती अर्ज कोणतेही न्यायालय अथवा राष्ट्रपतींसमोर प्रलंबित नाही तसेच याप्रकरणातील दोषींनी सादर केलेल्या फेरविचार याचिका या सर्वोच्च न्यायालयाने याआधीच फेटाळून लावल्या आहेत, यामुळे दोषींविरोधात डेथ वॉरंट जारी केले जावे अशी मागणी सरकारी पक्षाकडून करण्यात आली.

आता वॉरंट जारी झाल्यापासून ते प्रत्यक्षात शिक्षेची अंमलबजावणी होईपर्यंतच्या काळामध्ये दोषींना दुरूस्ती याचिका सादर करायची असेल तर करू शकतात असा युक्तिवादही सरकारी पक्षाकडून करण्यात आला. न्यायालयाने तो मान्य केला. या आदेशानंतर माध्यमांशी बोलताना दोषींचे वकील ए.पी.सिंह म्हणाले की, "" आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये दुरूस्ती याचिका सादर करू.'' तत्पूर्वी सत्र न्यायालयाने तिहार तुरूंग प्रशासनाकरवी या दोषींचे म्हणणे मागविण्याचे आदेश दिले होते, हे सर्वजण राष्ट्रपतींसमोर दया याचिका सादर करणार आहेत की नाही याबाबत विचारणा करण्यात आली होती.

न्यायालयांतील सुनावणी

सर्वोच्च न्यायालयाने 18 डिसेंबर रोजी याप्रकरणातील दोषी अक्षयची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली होती, मागील वर्षी 9 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने अन्य तीन दोषींच्या पुनर्विचार याचिकाही फेटाळून लावल्या होत्या. या प्रकरणात एकूण सहा आरोपी होती. याचप्रकरणातील दोषी राम सिंहने याआधीच तिहार तुरूंगात आत्महत्या केली आहे. यातील एक आरोपी हा अल्पवयीन असून त्याला बाल हक्क न्याय मंडळाने दोषी ठरविले होते, तीन वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर त्याची मुक्तता करण्यात आली होती. याआधी दिल्ली उच्च न्यायालय आणि सत्र न्यायालयाने या प्रकरणातील दोषींना ठोठावण्यात आलेली फाशीची शिक्षा 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली होती.

माझ्या मुलीला न्याय मिळाला असून या चारही नराधमांना मृत्यूदंड दिल्याने देशातील महिलांचे सक्षमीकरण होईल, त्यांना बळ मिळेल. या निकालामुळे देशातील जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्‍वास देखील अधिक दृढ होईल, अशी प्रतिक्रिया निर्भयाची आई
आशादेवी यांनी दिली,

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com