Former Mayor of Aurangabad oberoy | Sarkarnama

औरंगाबादचे माजी महापौर मनमोहनसिंग ओबेरॉय यांचे निधन

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 18 सप्टेंबर 2018

सर्वप्रथम ओबेरॉय नगरपालिकेत  1978 मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यांनतर पुन्हा 1988 मध्ये औरंगाबाद महापालिकेत अपक्ष म्हणून ते निवडून आले. दरम्यानच्या काळात त्यांनी सभागृहनेता, विरोधी पक्षनेता, उपमहापौर, महापौर पद भूषवले. 

औरंगाबाद : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेपासून पक्षाशी एकनिष्ठ आणि सात वर्ष शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडणारे माजी महापौर मनमोहनसिंग ओबेरॉय यांचे आज (ता. 18) दुपारी बारा वाजता निधन झाले. आजारी असल्यामुळे दोन आठवड्यापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.

1978 मध्ये सर्वप्रथम ओबेरॉय नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यांनतर पुन्हा 1988 मध्ये औरंगाबाद महापालिकेत अपक्ष म्हणून ते निवडून आले. दरम्यानच्या काळात त्यांनी सभागृहनेता, विरोधी पक्षनेता, उपमहापौर, महापौर पद भूषवले. 

1999 मध्ये राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाल्यापासून ते पक्षात कार्यरत होते. सात वर्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून काम करतांना त्यांनी शहरात पक्ष बळकट करण्यासाठी काम केले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यांशी त्यांची चांगली ओळख होती. राष्ट्रवादी पक्षातील इतर नेते देखील मनमोहनसिंग ओबेराय यांना महाराज नावाने ओळखायचे. राजकारणात येण्याआधी मनमोहनसिंग टॅक्‍सी युनियनचे अध्यक्ष देखील होते. आपल्या खुमासदार शैलीतील सडेतोड भाषणासाठी ते ओळखले जायचे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख