नियम पाळा, "नी' यम टाळा 

आरोग्य सेवेतील कर्मचारी आणि पोलिस डोळ्यात तेल घालून लोकांची रात्रदिवस काळजी घेत आहे.
नियम पाळा, "नी' यम टाळा 

मुंबई : कोरोनाच्या जनजागृतीसाठी केंद्र आणि राज्य सरकारबरोबर स्वयंसंस्थाही सरसावल्या आहे. कोरोनाच्या परिणाम कसे भोगावे लागतात याची माहिती प्रत्येक सरकार देत आहे. महाराष्ट्र परिचय केंद्रांने ही एक ट्‌विट करून नियम पाळा, "नी' यम टाळा असे आवाहन राज्यातील जनतेला केले आहे. 

डॉक्‍टर्स, नर्स आणि पोलिस अधिकारी-कर्मचारी कोरोनाविरोधातील युद्ध लढत आहे. महाराष्ट्रानेही कोरोनाला रोखण्यात काही प्रमाणात यश मिळविले असले तरी अजूनही कोरोनाचे रग्ण वाढत आहेत. लॉकडाऊनमध्ये घरी बसण्याऐवजी काही मंडळींपडून नियम धाब्यावर बसविले जात आहेत. अशा मंडळीना पोलिसानीही दंडुक्‍याचा प्रसाद दिला आहे.

आरोग्य सेवेतील कर्मचारी आणि पोलिस डोळ्यात तेल घालून लोकांची रात्रदिवस काळजी घेत आहे. जर घरात बसले तर कोरोनाला आपण रोखू शकतो हे ओरडून सांगत असतानाही का नियम भंग केला जात आहे असा सवालही केला आहे. 

आज स्पेन, अमेरिका, इटली हजारो लोक मृत्युमुखी पडले आहेत. आरोग्य व्यवस्थेची तेथे दैना उडाली आहे. जे रुग्णांवर उपचार करीत आहेत त्यांना कोरोनाने झपाटले आहे. दररोज शेकडो लोक या तीन देशात मृत्युमुखी पडत आहेत हे आपण पाहत असताना आपल्याकडे अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही.

त्यामुळे प्रत्येकाने घरी बसण्याचे आणि नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे. महाराष्ट्र परिचय केंद्राने यमाचे चित्र दाखवून दहा शब्दात कोरोना धोका लोकांना दाखविला आहे. या ट्‌विटला नेटकऱ्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे.याविषयी समाजात संतप व्यक्त केला जात आहे.  

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com