सांगली : महापूर ओसरू लागला पण मंदगतीने , पातळीत दीड फुटाने घट

* वाळवा तालुक्‍यात पाचशे घरे पडली* शिराळा तालुक्‍यात अफवेने प्रचंड तारांबळ* सांगली-माधवनगर रस्ता खुला झाला* राज्यातील नेत्यांचे पूरपाहणीसाठी दौरे* निवारा केंद्रातील लोकांना ताप, सर्दी, खोकला* अन्न, पाणी आणि दुधाची मोठ्या प्रमाणात मदत* काही हजार नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले* तीस हजारांवर लोक अद्याप महापुराच्या वेढ्यात
sangli-
sangli-

पाणीपातळी स्थिती
* आयर्विनची पातळी :  56.8 फूट
* आलमट्टी विसर्ग :  5 लाख क्‍यूसेक

सांगली :  गेल्या सहा दिवसांपासून सांगलीकरांची सत्त्वपरीक्षा पाहणारा कृष्णा-वारणा नद्यांचा महापूर अखेर आजपासून ओसरू लागला. त्यामुळे दोन्ही नद्यांच्या काठांवरील जनतेला थोडासा दिलासा मिळाला. शुक्रवारी रात्रीपर्यंत महापुराचे पाणी स्थिरावले होते. आज सकाळपासून अत्यंत धीम्या गतीने पूर ओसरू लागला आणि सायंकाळी पाचपर्यंत सुमारे दीड फुटापर्यंत पाणीपातळी खाली आली होती.

दरम्यान सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतील कृष्णा-वारणा नद्यांसह कोयना, पंचगंगा, दुधगंगा, घटप्रभा या नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने उसंत घेतली आहे. परिणामी धरणांत येणारे पाणी कमी झाले आहे.

त्या तुलनेत विसर्ग घटविण्यात आला; तर आलमट्टी धरणातून सुमारे पाच लाख क्‍युसेकने विसर्ग सुरू आहे. आज सूर्यदर्शन झाले. पुढील तीनएक दिवसांत महापूर झपाट्याने मागे हटेल, अशी माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. तोवर सांगलीकरांना सत्त्वपरीक्षेला सामोरे जावे लागणार, हे मात्र अटळ आहे.


या संपूर्ण परिस्थितीतून लोकांना बाहेर काढणे आणि जे सुरक्षित ठिकाणी थांबलेले आहेत, त्यांच्यापर्यंत अन्न, पाणी, दूधपुरवठा करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे. लष्कराच्या बोटीतून लोकांना बाहेर काढले जात आहे. करमाळा तालुक्‍यातील टेंभुर्णी येथून सोळा मासेमारीच्या बोटी मदतीसाठी दाखल झाल्या आहेत. या बोटींतून मदतीचे साहित्य लोकांपर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया अतिशय गतिमान झाली आहे.
आठ फूट मागे
स्टेशन चौकातील पूरस्थितीची पाहणी करता, तेथे सुमारे आठ फूट पाणी मागे सरकले असल्याचे चित्र लोकांनी टिपले. पाण्याची उंची अवघी दीड फुटाने कमी झाली असली; तरी शेवटच्या टोकाकडून पूर मागे हटण्याचा वेग वाढू शकतो, अशी आशा आता प्रबळ होते आहे.




 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com