पूरग्रस्त गाव स्वच्छ करायला बाहेरचे विद्यार्थी आले...गावातील तरुणांनी मात्र दुर्लक्ष केले....

पूरग्रस्त गाव स्वच्छ करायला बाहेरचे विद्यार्थी आले...गावातील तरुणांनी मात्र दुर्लक्ष केले....

ऐतवङे खुर्द : पूरग्रस्त ऐतवडे खुर्द (जि. सांगली) गावातील स्वच्छता मोहीम शेजारील गावातील सामाजिक संस्थेच्या युवक वर्गाने केली. मात्र स्थानिक युवकांनी स्वच्छता कामाला मदत करण्याऐवजी त्याकडे पाठ फिरवली.

पूरग्रस्त ऐतवडे खुर्द गावास परिसरासह संपूर्ण राज्यातील सामाजिक संघटना व व्यक्तिगत माध्यमातून पूरग्रस्त लोकांना विविध प्रकारची संसारोपयोगी मदत झाली. मात्र गावातील अस्वच्छता तशीच राहिली. पूरग्रस्तांना मदतीचा ओघ अधिकच झाला याची दखल घेऊन सामाजिक भावनेतून गावातील स्वच्छता करण्याचा उपक्रम ऐतवडे बुद्रुक येथील स्वावलंबी फौंडेशन चे कार्यकर्ते व आनंदराव नाईक महाविद्यालय चिखली आणि वारणा महाविद्यालय ऐतवडे खुर्द येथील गावात येऊन संपूर्ण गावाची स्वच्छता केली मात्र स्थानिक युवकांनी या स्वच्छतेकडे पाठ फिरवल्याचे विदारक चित्र दिसले.

वारणा नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने गावाला वेढा दिला होता. यामध्ये हजारो लोकांचे स्थलांतर करण्यात आले त्याचबरोबर जनावरेही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले गावात पुराचे पाणी आल्याने घाणीचे साम्राज्य पसरले होते. त्यासाठी साथीचे आजार पसरू नये म्हणून कुरळप प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय पथकाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. त्याचबरोबर पुराच्या कालावधीत गावातील पाण्यात बुडलेल्या घरांचा वीज पुरवठा खंडित कारणाचे काम भर पावसात ही विद्युत मंडळ कार्यालयातील कार्यकारी अभियंता सचिन वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी उत्तम रीतीने पार पाडले त्याचबरोबर गाव कामगार तलाठी मंडल अधिकारी ग्रामसेवक यांच्याही पथकाने पूरग्रस्तांची योग्य ती दखल घेतली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com