'भाजपमुक्त महाराष्ट्र, काँग्रेसमुक्त कर्नाटक!' निपाणीत रंगले पोस्टर युद्ध

कर्नाटक असो किंवा महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या वेळी दोन्ही राज्यातील नेतेमंडळी प्रचारासाठी गर्दी करतात. मात्र आता महाराष्ट्र विधानसभा आणि कर्नाटकातील विधानसभा पोटनिवडणूक झाल्यानंतर राजकीय ईर्षा शिगेला पोहोचल्याचे दिसत आहे. स्थानिक नेते व कार्यकर्त्यांमध्येही चुरस पेटल्याचे त्यावरून दिसत आहे.
Flex War in Nipani Between Congress And BJP
Flex War in Nipani Between Congress And BJP

निपाणी  : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच गेल्या महिन्यात राजकीय नाट्य मोठ्या प्रमाणात रंगले. त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने महाआघाडी करून सत्ता स्थापन केली. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री बनले. या सर्व घडामोडींकडे कर्नाटक सीमाभागाचे लक्ष लागून राहिले होते. अखेर येथील मराठी भाषिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपामुक्त महाराष्ट्र असा फलक लावला. त्यानंतर कर्नाटकातील विधानसभेच्या पोटनिवडणुका झाल्यावर भाजपने मुसंडी मारली. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांनी काँग्रेसमुक्त कर्नाटकाचा फलक लावला. त्यामुळे निपाणीत पक्षावरून पोस्टर युद्ध रंगून राजकीय ईर्षा शिगेला पोहोचल्याचे चित्र दिसत आहे.

महाराष्ट्रातील बाजारपेठ आणि राजकीय घडामोडींकडे नेहमीच कर्नाटक सीमाभागाचे लक्ष लागलेले असते. त्यानुसार महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर सर्वांचे लक्ष सरकार स्थापनेकडे लागले होते. या काळात मोठ्या प्रमाणात राजकीय सत्तानाट्य घडले. अखेर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यामुळे भागातील मराठी भाषिकांनी जल्लोष साजरा केला. तसेच येथील धर्मवीर संभाजीचौकात भाजपमुक्त महाराष्ट्र असा फलकही लावला. त्यानंतर कर्नाटकातील विधानसभेच्या पोटनिवडणुका होऊन त्यामध्ये भाजपने निर्विवाद यश मिळवले. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांनी येथील धर्मवीर संभाजीचौकात काँग्रेसमुक्त कर्नाटक अशा आशयाचा फलक लावला आहे. दोन्ही फलकांवर महत्त्वाच्या नेतेमंडळींची छायाचित्रेही झळकली आहेत. फटाक्यांचीही जोरदार आतषबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय चर्चेला निपाणी शहर व ग्रामीण भागात आले आहे.

विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपाच्या उमेदवारांनी विजय मिळाल्याने कर्नाटकातील भाजप सरकारची स्थिती चांगली झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील भाजपा सरकारला कोणताही धोका नाही, ही बाब अधोरेखित करण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी शहरात विविध ठिकाणी फलक लावून फटाक्यांच्या आतषबाजीत करण्यासह जल्लोष साजरा केला. त्यामुळे यापुढील काळात भाजप आणि काँग्रेस यांच्यात चुरशीचे राजकारण होणार हे निश्चित झाले आहे. एकंदरीत महाराष्ट्रात भाजपमुक्त तर कर्नाटकात काँग्रेसमुक्त असे फलक झळकु लागल्याने नागरिकांमध्ये राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

निवडणुकीदरम्यान दोन्ही राज्यातील नेत्यांची गर्दी

कर्नाटक असो किंवा महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या वेळी दोन्ही राज्यातील नेतेमंडळी प्रचारासाठी गर्दी करतात. मात्र आता महाराष्ट्र विधानसभा आणि कर्नाटकातील विधानसभा पोटनिवडणूक झाल्यानंतर राजकीय ईर्षा शिगेला पोहोचल्याचे दिसत आहे. स्थानिक नेते व कार्यकर्त्यांमध्येही चुरस पेटल्याचे त्यावरून दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com