flex by father of girl who left house | Sarkarnama

व्यतिथ झालेल्या बापाने गावात लावला फ्केक्स

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

सिद्धनेर्ली : व्हन्नुर (ता.कागल) येथे आई-वडिलांच्या इच्छे विरोधात पळून गेलेल्या मुलगीच्या श्रद्धांजलीचे फलक वडीलांनी लावण्याची घटना चांगलीच चर्चेत आहे. हा फलक पाहून असे कृत्य करणाऱ्या मुली भानावर येऊन आई-वडिलांचा विश्वासघात करू नयेत. या उद्देशाने हा फलक लावल्याचा मजकूर सुद्धा या फलकावर पालकांनी लिहिला आहे.

या मुलगीला पालकांनी विश्वासघातकी असे विशेषण लावले आहे . अतिशय भावनिक मजकूर असलेला हा फलक वाचून संवेदनशील नागरिकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या वाचून राहत नाहीत.

आई आजारी असताना सुद्धा या पळून गेलेल्या मुलगीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपल्याचा उल्लेख फलकावरील मजकुरात आहे. इथून पुढे आपण तुला आजपर्यंत सुख सुविधा दिल्या तशा देऊ शकत नाही, असेसुद्धा लिहिले आहे. गावातील मध्यवर्ती ठिकाणी लावलेला हा फलक काही जाणकार नागरिकांनी काढून बाजुला ठेवला. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून तो गावोगावी फिरताना दिसत आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख