Banners Against Tanaji Sawant in Solapur
Banners Against Tanaji Sawant in Solapur

माजी मंत्री तानाजी सावंतांना सोलापूरच्या शिवसैनिकांकडून खेकड्याची उपमा (व्हिडिओ)

सोलापूरचे माजी सहपालकमंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात सोलापूर मधील शिवसैनिकांमध्ये असंतोष दिसून येत आहे.तानाजी सावंत यांची महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये वर्णी नलागल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांच्याशी त्यांचे बिनसल्याची चर्चा आहे

सोलापूर : सोलापूरचे माजी सहपालकमंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात सोलापूर मधील शिवसैनिकांमध्ये असंतोष दिसून येत आहे. तानाजी सावंत यांची महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये वर्णी नलागल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांच्याशी त्यांचे बिनसल्याची चर्चा आहे.

त्यातच नुकत्याच झालेल्या उस्मानाबाद जिल्हा परिषद निवडणुकीत तानाजी सावंत यांनी महाविकास आघाडीबरोबर न जाता भाजपा सोबत जाऊन स्वतःचे पुतणे धनंजय सावंत यांना उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केले. पक्षादेश डावलल्याचे पडसाद आज सोलापूरमध्ये दिसत आहेत. 

तिवरे धरण खेकड्यांनी पोखरले हे त्यांचं विधान चांगलच गाजलं होतं, आता शिवसैनिकांकडूनच त्यांना खेकड्याची उपमा देण्यात आली आहे. 'हा खेकडा सोलापूर आणि धाराशिवची शिवसेना पोखरतोय... वेळीच नांग्या ठेचा'अशा मजकुराचे फ्लेक्स सध्या सोलापूरमध्ये झळकत आहेत.

जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता आणण्यात शिवसेनेच्या दहा सदस्यांची भूमिका महत्वाची ठरणार होती. पण सावंत यांच्या बंडाने यावर पाणी फिरले. आतापर्यंत सावंत यांना मातोश्रीवरून झुकते माप दिले जायचे. परंतु मंत्रीपदाच्यावेळी डावलल्याने संतापलेल्या सावंत यांनी थेट पक्षनेतृत्वालाच आव्हान दिले. सांवत यांच्या बंडाची कुणकुण काही दिवसाआधीच लागली होती. स्थानिक नेत्यांनी याची माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांना देखील दिली.

सावंत यांची समजूत काढण्यासाठी उध्दव ठाकरे, मिलिंद नार्वेकर यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला. पण सावंत यांनी त्यांचे फोनच घेतले नाही अशी देखील माहिती आहे. त्यामुळे सावंत यांनी ठरवून हे बंड केले हे स्पष्ट होते. आता सावंत यांची उपद्रव शक्ती क्षीण करण्यासाठी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदारा कैलास पाटील यांना पक्षनेतृत्वाकडून अधिक बळ दिले जाण्याची शक्‍यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com