शिवसेनेकडेच पाच वर्षे मुख्यमंत्रिपद : राष्ट्रवादीकडे गृह खाते शक्य

सत्तास्थापनेचे गणित सोडविण्यात तीनही पक्षांना यश मिळाल्याचा दावा!
शिवसेनेकडेच पाच वर्षे मुख्यमंत्रिपद : राष्ट्रवादीकडे गृह खाते शक्य

मुंबई : महाराष्ट्रात शिवआघाडीचे सरकार स्थापनेसाठी हालचाली वेगाने सिरू असून आता सत्तावाटपाचे सूत्र ठरविण्यात येत आहे. काही माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार सेनेकडेच पाच वर्षे मुख्यमंत्रिपद राहणार असून राष्ट्रवादीला गृह खाते मिळू शकते. या खात्यासाठी राष्ट्रवादी आग्रही आहे.

सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याच्या मार्गावर असून मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे. तसेच हा प्रश्न वारंवार का विचारता, असा प्रतिसवालही त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना केला.

काॅंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीनही पक्षांच्या नेत्यांच्या समन्वय बैठकीत ठरल्यानुसार सत्तावाटपाचे सूत्र ठरले आहे. 

काही टिव्ही वाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार तीनही पक्षांनी 14-14-12 असं मंत्रिपदाचं सूत्र ठरवल्याची माहिती आहे. त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्रिपद हे पाचही वर्ष शिवसेनेकडेच असेल, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे एक-एक उपमुख्यमंत्रिपद असेल, असंही सांगण्यात येत आहे.


महत्त्वाची खाती सर्वांच्या वाट्याला

महत्वाची चार खाती प्रत्येक पक्षाला वाटून देण्यात येणार आहेत. ग्रामीण भागाशी संबंधित खाती प्रत्येकी एका पक्षाच्या वाट्याला येऊ शकतात. त्यानुसार गृह, अर्थ, उद्योग एका पक्षाकडे असण्याची शक्यता आहे. तर महसूल, सार्वजनिक बांधकाम आणि ऊर्जा दुसऱ्या पक्षाकडे असण्याची शक्यता आहे.

विधानसभेतील पक्षीय बलाबल 

भाजप – 105
शिवसेना – 56
राष्ट्रवादी – 54
काँग्रेस – 44
बहुजन विकास आघाडी – 03 (महाआघाडी)
प्रहार जनशक्ती – 02 (शिवसेनेला पाठिंबा)
एमआयएम – 02
समाजवादी पक्ष – 02 (महाआघाडी)
मनसे – 01
माकप – 01
जनसुराज्य शक्ती – 01 (भाजपला पाठिंबा)
क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01 (शिवसेनेला पाठिंबा)
शेकाप – 01 (भाजपला पाठिंबा)
रासप – 01 (भाजपला पाठिंबा)
स्वाभिमानी – 01 (महाआघाडी)
अपक्ष – 13 – (8 अपक्ष भाजपसोबत, 5 अपक्ष शिवसेनेसोबत)
एकूण – 288

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com