पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेसाठी देशाची सुरक्षाही महत्त्वाची : अमित शहा 

five trillion economy contry must secure amit shah said
five trillion economy contry must secure amit shah said

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे नेऊ इच्छित आहेत. यासाठी सुरक्षा दल मजबूत असणे तितकेच गरजेचे आहे. देशातील अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा राखण्याची गरज आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. 

सध्या "थर्ड डिग्री'चे युग नाही. तपासासाठी शास्त्रीय पद्धतीचा उपयोग करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. 

ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

देशातील सुरक्षाव्यवस्था सक्षम असेल, तरच भारताला पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठणे शक्‍य होईल असे सांगून ते म्हणाले, की देशातील अंतर्गत सुरक्षा राखताना सुमारे 34 हजार पोलिस कर्मचाऱ्यांनी बलिदान दिल्याचे ते म्हणाले. बदलत्या काळानुसार आणि आव्हानानुसार पोलिस दलातही बदल करण्याची आवश्‍यकता आहे. मात्र, सुधारणा प्रक्रियेत अडथळे असून, यासाठी ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंटकडून पुन्हा रचना करण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. 

देशात न्यायवैद्यक शास्त्र विद्यापीठ आणि कॉलेजची संख्या वाढविण्याची गरज असून, जेणेकरून दोषींना तत्काळ पकडणे सोपे जाईल. पीडितांना लवकर न्याय मिळवून देण्यास हातभार लागेल आणि जनतेतील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसेल असेही ते म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com