औरंगाबादेत कोरोनाचे आणखी पाच रुग्ण; संख्या आठवर

औरंगाबादेत आणखी पाच जणांचे स्वॅब पॉझिटिव्ह आल्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आठवर पोहोचली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात चार, शासकीय रुग्णालय घाटीमध्ये दोन , तर एका कोरोनाबाधित रुग्णावर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत
Five More Tested positive for Corona in Aurangabad
Five More Tested positive for Corona in Aurangabad

औरंगाबाद : औरंगाबादेत आणखी पाच जणांचे स्वॅब पॉझिटिव्ह आल्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आठवर पोहोचली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात चार, शासकीय रुग्णालय घाटीमध्ये दोन , तर एका कोरोनाबाधित रुग्णावर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर एक कोरोनाबाधित महिला पुर्णपणे बरी होऊन घरी गेली आहे.  शहर व मराठवाड्यात कोरोना रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील औरंगाबाद, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण आढळत आहेत. यापैकी काही रुग्ण हे परप्रांतीय तर राज्याच्या विविध शहरातून आल्याचे समोर आले आहे. औरंगाबादेत सर्वप्रथम एक महिला प्राध्यापिकेला करोनाची बाधा झाली होती. रशिया व कजाकिस्तान विमान प्रवास करून आलेल्या या महिलेला कोरोना झाल्याचे निदान झाले होते .पंधरा दिवसांच्या उपचारानंतर ही महिला पूर्णपणे बरी होऊन घरी परतली होती.

त्यानंतर बरेच दिवस जिल्ह्यात कोरोनाचाचा एकही  नवा रुग्ण आढळला नव्हता ,त्यामुळे आरोग्य यंत्रणा, जिल्हा प्रशासन व नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून शहरात कोरणा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. 

दोन दिवसांपूर्वी एका 21 वर्षाच्या तरुण व एका महिलेला कोरोना झाल्याचे निदान झाले होते. त्यानंतर आज पुन्हा पाच नवे रुग्ण आढळले असून त्यांचे स्वयाब पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये एका सात वर्षीय मुलीचा देखील समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com