पोस्टाच्या बचत खात्याला पाचशे रुपयांची अट; मोदी सरकारने घेतला निर्णय 

राष्ट्रीयीकृत बॅंकांमधील खात्याला मिनिमम बॅलन्सची अट लागू केल्यानंतर आता पोस्टाच्या (टपाल) बचत खात्यातही किमान 500 रुपये असणे बंधनकारक करण्यात आले आहे. तत्पूर्वी बचत खात्यात किमान 50 रुपये असोवत, अशी अट होती
Five Hundred Rupees Minimum Balance Required for Postal Bank Accounts
Five Hundred Rupees Minimum Balance Required for Postal Bank Accounts

सोलापूर : राष्ट्रीयीकृत बॅंकांमधील खात्याला मिनिमम बॅलन्सची अट लागू केल्यानंतर आता पोस्टाच्या (टपाल) बचत खात्यातही किमान 500 रुपये असणे बंधनकारक करण्यात आले आहे. तत्पूर्वी बचत खात्यात किमान 50 रुपये असोवत, अशी अट होती. पाचशे रुपयांपेक्षा कमी रक्‍कम असल्यास वार्षिक शंभर रुपयांचा दंड करण्याचा निर्णय मोदी सरकारने 12 डिसेंबरला घेतला. पाचशे रुपयांपेक्षा कमी रक्‍कम असलेली बचत खाती काही महिन्यांत बंद होतील, असेही वरिष्ठ अधिकारी सांगू लागले आहेत.

बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात सोशल मिडियाचा वापर वाढला आणि प्रत्येकांच्या हाती स्मार्टफोन आला. त्यामुळे टपाल कार्यालये ओस पडल्याचे चित्र असून पोस्टमनची रिक्‍त पदेही मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत. काही महिन्यांपूर्वी मोदी सरकारने पोस्टमनने ग्राहकांपर्यंत पोहचून त्यांच्याशी बॅंकिंग व्यवहार करण्याचेही आवाहन केले होते. मात्र, त्याला म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही. या पार्श्‍वभूमीवर आता टपाल कार्यालयाकडील बचत खात्यात किमान पाचशे रुपये ठेवावेत, असा नियम केल्याने ग्राहकांची पंचाईत झाली आहे. दरम्यान, मोदी सरकारच्या नव्या निर्णयाबद्दल खातेदारांनी नाराजी व्यक्‍त केली असून अनेकांनी टपाल कार्यालयाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

केंद्र सरकारच्या निर्णयानुसार आता पोस्टाच्या बचत खात्यात 500 रुपये असणे बंधनकारक आहे. यापूर्वी बचत खात्यात 50 रुपये असावेत, असा निकष होता. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी सुरु असून खातेदारांना तसे आवाहन करण्यात आले आहे - सुरेश सिरसी, प्रवर अधिक्षक, सोलापूर टपाल कार्यालय

ठळक बाबी...

- बचत खात्यात ५० रुपयांचा बॅलन्स असावा हा नियम मोदी सरकारने बदलला
- पोस्टाच्या बचत खात्यात पाचशे रुपयांपेक्षा कमी रक्‍कम असल्यास शंभर रुपयांचा वार्षिक दंड
- सर्वसामान्यांची बचत खाती बंद होण्याची भिती : नव्या खात्यासाठी नागरिकांनी गाठली जवळची बॅंक
- बचत खात्यात ५०० रुपये ठेवण्याचे ग्राहकांना अधिकाऱ्यांचे आवाहन : कर्मचाऱ्यांअभावी ग्राहक अनभिज्ञच

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com