मंत्रालयातील पाच उपसचिवांचे अवर सचिव पदावर डिमोशन

पदानवत करण्यात आलेल्या अधिका-यांची नावे अशी आहेत ,१ . श्री म. द. जाधव – ग्रामविकास व जल जलसंधारण,२. श्री ब. शे. मांडवे- कौशल्य विकास व उद्योजकता विभाग,३. श्री. अ. ना. वळवी- सामान्य प्रशासन विभाग,४. श्री. प्र. ब. सुरवसे – सार्वजनिक बांधकाम विभाग,५. श्री. श्या.र. चौरे- अल्पसंख्याक विकास विभाग
mantralaya
mantralaya

 मुंबई:  ऐन बदल्याच्या आणि बढतीच्या हंगामात मंत्रालयातील पाचउपसचिवांना पदानवत (डिमोशन) करण्यात आले आहे. त्यामुळे मंत्रायलयातील नोकरशाहीमध्ये खळबळ उडाली आहे .

आदिवासींच्या गृहनिर्माण सोसायटीमध्ये (सिटी टॉवर प्रकरणात ) गैरमार्गाने शासनाचे अनुदान लाटल्याचा ठपका ठेवत अनेक अधिका-याची पदोन्नतीच्या रोखण्यात आली होती. त्यामुळे सेवाज्येष्ठतेत मागे असतानाही या पाच अधिका-यांच्या पदोन्नती मिळाली होती. 

पण सिटी टॉवर मधील अधिका-यांना क्लीन चिट मिळाल्याने सेवाजेष्टते नुसार त्यांना पदोन्नती देणे शासनानाला भाग पडले . त्यामुळे मर्यादित पदसंख्या आणि पदोन्नती मिळालेले अधिकारी जास्त अशे परिस्थिती झाली . त्यामुळे सेवाज्येष्ठता यादीत सर्वात खाली असलेल्या पदोन्नत केलेल्या या अधिका-यांना पदानवत करण्यात आले आहे. तसा अध्यादेशही सामान्या प्रशासन विभागामार्फत जारी करण्यात आला आहे.


अनुसचित जमातीमधील अधिका-यांनी हौसिंग सोसायटी स्थापन करून नियमबाह्य पध्दतीने शासनाचे ९२ लाख रूपयांचे अनुदान लाटल्याचा ठपका या प्रकरणात या अधिका-यांवर ठेवला होता. त्यामध्ये एकूण ३४ अधिका-यांचा समावेश होता. चौकशी पुर्ण होईपर्यंत यातील संशयीत अधिका-यांना पदोन्नती न देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.

त्यामुळे नियमानुसार बढतीसाठी पात्र असलेल्या या पाच अधिका-यांना पदोन्नती मिळाली होती. 

त्यामध्ये  श्री म. द. जाधव – ग्रामविकास व जल जलसंधारण, 

श्री ब. शे. मांडवे- कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, 

श्री. अ. ना. वळवी- सामान्य प्रशासन विभाग,

 श्री. प्र. ब. सुरवसे – सार्वजनिक बांधकाम विभाग,

 श्री. श्या.र. चौरे- अल्पसंख्याक विकास विभाग या अधिका-यांचा समावेश होता.

मात्र सिटी टॉवर प्रकरणातील अधिका-यांना क्लीन चिट मिळाल्याने सेवा जेष्ठता यादी यादीत या पाच अधिका-यांची नावें नसल्याने त्यांना अवर सचिव पदावर पदानवत करण्यात आले आहे.


विशेष म्हणजे यातील काही अधिका-यांनी शासनाच्या विरोधात मॅटमध्ये खटला दाखल केला आहे. तर काहीजण सरकार विरोधी मॅटमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचे समजते आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com