पक्षादेश झुगारून मतदान करणाऱ्या बसपाच्या पाच नगरसेवकांची हकालपट्टी

 पक्षादेश झुगारून मतदान करणाऱ्या बसपाच्या पाच नगरसेवकांची हकालपट्टी

औरंगाबाद : नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात घोडेबाजाराला आळा घालण्याचा संकल्प महायुती आणि आघाडीच्या उमेदवारांकडून करण्यात आला होता. मात्र तरीही घोडेबाजार झाल्याचे प्रकार आता उघडकीस येऊ लागले आहेत. बहुजन समाज पार्टीच्या महापालिकेतील पाच नगरसेवकांनी पक्षाचा व्हीप नाकारत मतदान केल्याचा ठपका ठेवत त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. 

औरंगाबाद महापालिकेत बहुजन समाज पार्टीचे पाच नगरसेवक आहेत. औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत या सर्व नगरसेवकांना मतदान न करता गैरहजर राहावे असे स्पष्ट आदेश पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांच्याकडून देण्यात आले होते. परंतु प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी या सर्व नगरसेवकांनी पक्षादेश झुगारत मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवत मतदान केले होते. महायुतीचे अंबादास दानवे या निवडणुकीत विक्रमी 524 मते घेऊन विजयी झाले होते. त्यानंतर संबंधित नगरसेवकांचा अहवाल बसपाच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठवण्यात आला होता. त्यानुसार 25 ऑगस्ट रोजी मुंबई येथील बसपा भवनात प्रदेश समितीची बैठक घेण्यात आली. 

केंद्रीय महासचिव रामअचल राजभर, खासदार अशोक सिध्दार्थ, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांच्या उपस्थित या पाचही नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. बसपा जिल्हाध्यक्ष सचिन बनसोडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे नगरसेक राहूल सोनवणे, सुनिता चव्हाण, प्रेमलता दाभाडे, विजया बनकर व भारती सोनवणे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे कळवले आहे. शिवाय संबंधित नगरसेवकांना त्यांची हकालपट्टी झाल्याचा निरोप फोनवरून देण्याच आल्याचे सचिन बनसोडे यांनी सरकारनामाशी बोलतांना सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com