सरकारने परवानगी दिली तर मी पेट्रोल- डिझेल 35-40 रुपयांत विकेन : रामदेवबाबा

सरकारने परवानगी दिली तर मी पेट्रोल- डिझेल 35-40 रुपयांत विकेन : रामदेवबाबा

नवी दिल्ली ः ""केंद्र सरकारने मला परवानगी दिली आणि करांमध्ये थोडीफार सूट दिली, तर मी पेट्रोल-डिझलेची 35 ते 40 रुपये प्रतिलिटर दराने विक्री करू शकतो,'' असे प्रतिपादन योगगुरू रामदेव बाबा यांनी केले आहे. 

एका खासगी वाहिनीवरील कार्यक्रमात बोलताना रामदेव बाबांनी इंधनाच्या दरवाढीबाबत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ""मोदी सरकारने महागाई कमी करायला हवी. जर महागाई कमी केली नाही तर सरकारला मोठा फटका बसेल. 2019 आधी इंधनाचे दर कमी करा, असा सल्ला मी यापूर्वीच मोदी सरकारला दिला आहे.'' 

रामदेव बाबा म्हणाले, ""केंद्र सरकारने जर मला पेट्रोल पंप चालवण्याची परवानगी दिली आणि करांमध्ये सवलत दिली तर मी संपूर्ण देशात 35 ते 40 रुपये प्रतिलिटर दराने विक्री करू शकतो. सरकारने इंधनाला वस्तू व सेवाकराच्या ("जीएसटी') कक्षेमध्ये आणावे.'' 

पुढील निवडणुकीमध्ये भाजपचा प्रचार करणार नसल्याचेही त्यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले. दोन दिवसांपूर्वीही रामदेव बाबा यांनी महागाईवरून मोदी सरकारवर निशाणा साधला होता. रुपयाची अब्रू चव्हाट्यावर आली आहे. रुपयाने ऐतिहासिक नीचांक गाठला आहे. रुपयाची ही अवस्था बघून आता लाजेलाही लाज वाटत असेल, अशा शब्दांत त्यांनी टीका केली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com