केंद्रीय राज्यमंत्री डाॅ. जितेंद्रसिंह यांचा असाही फिटनेस फंडा - Dr. Jitendrasingh Jogging At his Residence in New Delhi | Politics Marathi News - Sarkarnama

केंद्रीय राज्यमंत्री डाॅ. जितेंद्रसिंह यांचा असाही फिटनेस फंडा

वृत्तसंस्था
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिज्जीजू यांनी #FitIndia#FreedomRun मोहिमेचे आयोजन करीत स्वतःला फिट ठेवण्याचे आवाहन देशवासियांना केले आहे. प्रत्येकाने स्वतःला फिट ठेवण्यासाठी रोज किमान दोन किलोमीटर धावावे, असे त्यांचे आवाहन आहे

नवी दिल्ली : किरण रिज्जीजू जी तुमच्या आवाहनासमोर मी धावण्याचा प्रयत्न केला. माझा हा प्रयत्न हास्यास्पद ठरला तर तुम्ही जबाबदार असाल, असे मिस्किलपणे लिहित केंद्रीय राज्यमंत्री डाॅ. जितेंद्र सिंग यांनी क्रिडामंत्री रिज्जीजू यांना उद्देशून करत आपला धावण्याचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्याचे हे ट्विट तितक्याच खिलाडूपणे घेत क्रिडामंत्र्यानी त्यांना प्रोत्साहित केले आहे.

देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिज्जीजू यांनी #FitIndia#FreedomRun मोहिमेचे आयोजन करीत स्वतःला फिट ठेवण्याचे आवाहन देशवासियांना केले आहे. प्रत्येकाने स्वतःला फिट ठेवण्यासाठी रोज किमान दोन किलोमीटर धावावे, असे त्यांचे आवाहन आहे. अनेक क्रीडापटूंनी ही मोहिम उचलून धरत रिज्जीजू यांना टॅग करत आपल्या धावण्याचे व्हिडिओ ट्विट केले आहेत. येत्या २ आॅक्टोबरपर्ंत ही मोहिम सुरु राहणार आहे. 

या आवाहनाला प्रतिसाद म्हणून केंद्रीय राज्यमंत्री डाॅ. जितेंद्र सिंग यांनी आपला धावण्याचा व्हिडिओ ट्विट केला. माझा हा प्रयत्न हास्यास्पद ठरू नये, अशी अपेक्षा मोठ्या खिलाडूपणे त्यांनी व्यक्त केली. त्यावर प्रतिक्रिया देताना किरण रिज्जीजू यांनीही एक ट्विट केले. मी अनेक फिटनेस व्हिडिओ पाहिले. पण हा व्हिडिओ सर्वाधिक उत्साह देणारा आहे, असे सांगत त्यांनी जितेंद्र सिंग यांना प्रोत्साहित केले. जितेंद्र सिंग जी तुम्ही काळजी करु नका, तुम्ही खूप फिट आहात. ही मोहिम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहनही त्यांनी केले.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख