`लाल माती`तील आमदार : महेश लांडगे

पुणे जिल्ह्यातील वजनदार आमदार म्हणून महेश लांडगे यांची ख्याती आहे. राजकारणातील त्यांचे वजन नंतर वाढत गेले. पहिलवान असल्यानेलांडगेे यांना कुस्तीचा भारी शौक आहे. निर्व्यसनी राहणे, वेळेवर व्यायाम आणि आहार करणे ही त्यांच्या फिटनेसची सूत्रे आहेत.
`लाल माती`तील आमदार : महेश लांडगे

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील भोसरी हे पहिलवानाचे गाव म्हणून ओळखले जाते. योगायोगाने भोसरीचे सध्याचे आमदार महेश लांडगे हे सुद्धा पहिलवानच आहेत. पुणे जिल्हाभर  त्यांची तीच ओळख आहे. नियमित व्यायाम हेच आपल्या ऊर्जेचे गमक असल्याचे ते सांगतात.

जोर-बैठकांच्या जोडीने ते सायकलिंग, पोहणे, जीम असेही व्यायामाचे वैविध्य ठेवले आहे. पहिलवान असल्याने त्यांचे वजन हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आणखी साजेसे ठरले आहे.

भोसरीत आजही कोल्हापूरसारख्या तालमी आहेत. येथील काही मंडळे आजही तेथील तालमीच्या नावानेच ओळखली जातात. लांडगे हे उत्तम खेळाडू आहेत.खेळाडू ते नगरसेवक आणि नगरसेवक ते आमदार असा यशस्वी प्रवास त्यांनी केला आहे.


शालेय जीवनापासून त्यांना कुस्ती खेळाची आवड आहे. लाल मातीत अनेकांना त्यांनी अस्मान दाखविलेले आहे. राजकारणात प्रवेश केल्यानंतरही त्यांनी या आखाड्यातील कुस्त्याही चितपट केल्या आहेत. कायम उत्साही दिसणाऱ्या लांडगे यांच्या यशाचे गमक नियमित व्यायाम हेच आहे. 

आमदारांचा व्यायाम असा 

आमदार लांडगे यांच्या दिवसाची सुरवातच व्यायामाने होते. सकाळी साडेपाच वाजता प्रथम ते सूर्यनमस्कार घालतात. जोर, बैठका, धावणे, चालणे, सायकल चालवणे अशा पारंपरिक व्यायाम नंतर करतात. त्यानंतर जिममध्ये जाऊन आधुनिक व्यायाम करतात. तेथील 'ट्रेडमिल'वर जवळपास तीन किलोमीटर चालतात. चार किलोमीटर धावतात. प्रत्येक रविवारी दिघीच्या डोंगरावर चालायला जातात. स्वीमिंग पुलावर मनमुराद पोहण्याचा आनंदही घेतात. व्यायामाकडे ते कधीही दुर्लक्ष करीत नाहीत. दररोज व्यायाम आणि सकस आहार हाच आपला 'फिटनेस'चा मंत्र असल्याचे आमदार लांडगे सांगतात. कामानिमित्त बाहेरगावी असले, तरी तेथे चालण्याच्या व्यायाम ते चुकवीत नाहीत. सकाळी केलेला व्यायाम हा दिवसभरातील कामासाठी ऊर्जा देतो, असे ते म्हणतात. व्यायामाकडे दुर्लक्ष करू नये तसेच आहारावरही अधिक लक्ष द्यावे, असा फिटनेसचा सल्ला त्यांनी युवकांना दिला आहे. 

आहाराचे वेळापत्रक 
महेशदादांचा आहार शाकाहारी आणि मांसाहारी असा दोन्हीही आहे. सकाळी खजूर, भिजलेले बदाम, व्यायामानंतर थंडाई त्यानंतर नाष्टा, कामकाजानंतर दुपारी जेवण, सायंकाळी ज्यूस किंवा फळे, रात्री जेवण व झोपण्याआधी दूध पिणे हा दिनक्रम आहे. फळे, भाज्या दूध, ताक आहारात रोज असतेच. व्यस्त कामकाजामुळे झोपेचे नियोजन नाही पण, सकाळी व्यायामासाठी वेळेत उठणे बंधनकारक केले आहे, असे दादा सांगतात. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com