असा आहे युवा आमदार सिद्धार्थ शिरोळेंचा फिटनेस मंत्रा! - fitness mantra of mla sidharth shirole | Politics Marathi News - Sarkarnama

असा आहे युवा आमदार सिद्धार्थ शिरोळेंचा फिटनेस मंत्रा!

उमेश घोंगडे
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

....

पुणे : रोज एक तास व्यायाम, एकवेळ नाश्‍ता व दोन वेळा पोटभर जेवण या अशी माझी दैनंदिनी आहे. अमूक एक असा "फॉर्म्यूला' नाही. जेवताना पोटभर जेवायची शिस्त मात्र पाळतो. यातूनच फिटेनस साधला जातो. नव्या विधानसभेतील तरूण आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा "फिटनेस फंडा' अगदी साधा सोपा वाटत असला तरी रोज एक तास व्यायामाला आहाराच्या शिस्तीची जोड त्यांनी दिली आहे.

नियमित व्यायाम आणि त्यातील शिस्तीची परंपरा आमदार शिरोळे यांना वडीलांपासूनच मिळाली आले. माजी खासदार असलेले त्यांचे वडील अनिल शिरोळे व्यायाम आणि एकुणच शिस्तीच्या बाबतीत पुणेकरांना सुपरिचित आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आमदार शिरोळे यांनी व्यायाम आणि आहारचा मेळ घातलाय. वय 41 असले तरी अजूनही ते तिशीत आहेत, असे वाटण्याजोगा "फिटनेस' त्यांनी ठेवलाय.

आपला दिनक्रम सांगताना आमदार शिरोळे म्हणाले, "" सकाळी सहा ते सव्वासह दरम्यान उठतो. एका तासात आवरल्यानंतर साधारण सव्वासात वाजता जिमला जातो. एक तास व्यायाम करतो. आठवड्यातील तीन दिवस वेट ट्रेनिंग, दोन दिवस कार्डिओ व एक दिवस स्ट्रेचिंग असे आठवड्याचे व्यायामाचे वेळापत्रक आहे. व्यायाम करून आल्यानंतर सकाळी साडेनऊच्या सुमारास नाश्‍ता करतो. त्यानंतर कामकाजाला सुरवात होते. दुपारी अडीच वाजता जेवण करतो. रात्रीचे जेवण साधारण नऊ वाजण्याच्या सुमारास करतो. जेवणात अमूक एक गोष्ट आवडीची नाही. आठवड्यात दोन ते तीनवेळा मांसाहारी खातो. इतर दिवशी शाकाहारी जेवणच घेतो. खाण्यात विशिष्ट असा पदार्थ नाही. जे असेल ते खाण्याची सवय आहे. झोपण्याची वेळ पाळण्याचा प्रयत्न करतो. मात्र, सात तास झोप झाली पाहिजे याची काळजी घेतो.''

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख