फिटनेस फंडा - जळगावचे भाजप आमदार सुरेश भोळे

''आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाने फिटनेसला महत्त्व दिलेच पाहिजे. मी दररोज दीड तास व्यायामाला देतो. मी जळगावात असो किंवा मुंबईत, सकाळचा व्यायाम चुकवत नाही. सायकलिंग, जॉगिंग आणि रनिंगने मी फीट राहतो. एक तास व्यायामाला दिल्याचा फायदा दिवसभर जाणवतो.''सुरेश भोळे, आमदार, भाजप जळगाव.
फिटनेस फंडा - जळगावचे भाजप आमदार सुरेश भोळे

सुरेश भोळे हे जळगाव शहराचे भाजपतर्फे निवडून आलेले आमदार आहेत. सुरेशदादा जैन यांना पराभूत केल्याने सुरेश भोळेंचे नाव महाराष्ट्रभर परिचित झाले. वयाची पंचेचाळीशी गाठलेले सुरेश भोळे सक्रिय राजकारणी आहेत. एकदा दिवस सुरू झाला की नागरिकांच्या भेटी, गाठी, सभा, संमेलन, बैठका, लग्न, समारंभात यामध्ये वेळ कसा जातो हे कळत नाही त्यामुळे सुर्योदयाची वेळ आपली मानून आमदार महाशय व्यायामाला वेळ देतात.

सुरेश भोळेंना पहाटे उठायची सवय आहे. सुर्योदयाला ते घराबाहेर पडतात. सायकलवर बहिणाबाई उद्यानात जातात आणि परततातही सायकलवरच. त्यामुळे सहा-सात किलोमीटर सायकलिंग होते. बहिणाबाई उद्यानातील जॉगिंग ट्रॅक 400 मीटर्सचा आहे. त्यावर आधी सोळा फेऱ्या वेगाने चालतात. शेवटी दोन फेऱ्या मात्र धावून पूर्ण करतात. त्यानंतर उद्यानातच जॉगिंग, स्ट्रेचिंग आणि इतर व्यायाम करतात.

आपल्या व्यायामाच्या आवडीबाबत बोलताना आमदार भोळे म्हणाले, ''चाळीसगाव तालुक्‍यात वाघळी येथे माझे बालपण गेले. खेळण्याची व पोहण्याची आवड होती. 1985 नंतर जळगावला आलो. खांबेटे व्यायामशाळेत तेव्हा मी जात असे. टप्प्याटप्प्याने दीडशे जोर बैठका त्याकाळी मी मारीत असे. जळगावच्या मेहरूण तलावातही मी पोहण्यास जात असे. व्यवसायाचा आणि राजकारणाचा व्याप वाढला तरीही मी सकाळच्या व्यायामाचा नित्यनेम कायम राखतो. मुंबईत असलो तरी सकाळीच मरिन ड्राईव्हवर मोठी रपेट मारून येतो त्यामुळे दिवसभर कामासाठी ऊर्जा मिळते.''

आमदार भोळे यांचा असा आहे फिटनेस फंडा.
* दररोज दीड तास व्यायाम.
* एक किलोमीटर धावणे.
* साडे सहा किलोमीटर वेगाने चालणे.
* सहा किलोमीटर सायकलिंग.
* आहारावर नियंत्रण - तेलकट पदार्थ वर्ज्य.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com