दररोज व्यायाम व शाकाहार हाच फिटनेसचा मंत्र : यवतमाळ जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख - Fitness Funda Dr. Rajesh Deshmukh Yavatmal | Politics Marathi News - Sarkarnama

दररोज व्यायाम व शाकाहार हाच फिटनेसचा मंत्र : यवतमाळ जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

चेतन देशमुख
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ राहत नाही. जिल्हाधिकारी पदासारख्या अधिकारपदावर काम करणाऱ्या व्यक्तीला तर विविध व्यवधानांकडे लक्ष द्यावे लागते. या सर्व कार्यक्रमातून यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी फिटनेसकडे कधीही दुर्लक्ष केलेले नाही. दररोज व्यायाम व शाकाहार हाच आपला फिटनेसचा मंत्र असल्याचे डॉ. देशमुख यांचे म्हणणे आहे.

यवतमाळ : धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ राहत नाही. जिल्हाधिकारी पदासारख्या अधिकारपदावर काम करणाऱ्या व्यक्तीला तर विविध व्यवधानांकडे लक्ष द्यावे लागते. या सर्व कार्यक्रमातून यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी फिटनेसकडे कधीही दुर्लक्ष केलेले नाही. दररोज व्यायाम व शाकाहार हाच आपला फिटनेसचा मंत्र असल्याचे डॉ. देशमुख यांचे म्हणणे आहे.

फिटनेससाठी किंवा व्यायामासाठी वेळ मिळत नाही, हा अनेकांचा दावाच खोटा असल्याचे डॉ. देशमुख यांचे मत आहे. डॉ. देशमुख गेल्या काही महिन्यांपासून यवतमाळचे जिल्हाधिकारी आहेत. ते कुठेही जाण्यापूर्वी तिथल्या टेनिस कोर्टची माहिती घेतात. महाविद्यालयीन जीवनापासून त्यांना टेनिस खेळाची आवड आहे. टेनिस खेळाची व्यवस्था नसल्यास जिममध्ये जाऊन आवश्‍यक व्यायाम करतात. डॉ. देशमुख यांचा दिवस सकाळी साडेपाच वाजता सुरू होतो. सकाळी 51 सूर्यनमस्कार करून व्यायामाला सुरूवात होते. सकाळी 6 वाजता ते जिममध्ये हजर होतात. जिममधील ट्रेडमिलवर जवळपास तीन किलोमीटर अंतर चालतात तसेच चार किलोमीटर धावण्याचा व्यायाम करतात. या दिनचर्येत फारसा बदल होत नाही.

काही कामानिमित्त बाहेरगावी असल्यास किंवा प्रशिक्षणासाठी दुसऱ्या राज्यांमध्ये गेल्यानंतरच या व्यायामात बदल होतात. तरीही तेथे चालण्याच्या व्यायामात मात्र खंड पडत नाही. सकाळी होणारा व्यायाम दिवसभरातील कामासाठी टॉनिक उपलब्ध करून देत असल्याचे डॉ. देशमुख आवर्जुन सांगतात. युवा पिढीने व्यायामाकडे दुर्लक्ष करू नये व आहारावर अधिक लक्ष देण्याचा सल्लाही त्यांनी दिला. काही तरुण जंक फूडला पसंती देतात. यावर डॉ. देशमुख यांना नाराजी व्यक्त केली. या जंक फूडपासून तरुणांनी दूर राहणेच उत्तम आहे. काही तरुण बलिष्ट होण्यासाठी कृत्रिम सप्लीमेंट घेतात. यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. घरचे शाकाहारी साधे जेवण हाच आपला आहार असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख