विरोधकांचा शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार; राज्याच्या इतिहासातली पहिलीची घटना

राजकारणात कितीही टोकाचे मतभेद असले तरी शपथविधी सोहळ्याला विरोधी पक्षनेत्यांसह विरोधी पक्षातले अनेक नेते उपस्थित राहतात. लोकशाहीत सरकार व विरोधी पक्षातला हा संवाद व राजशिष्टाचार असतो. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी या शपथविधी सोहळ्यावरच बहिष्कार टाकल्याचे आश्‍चर्य व्यक्‍त केले जात होते
Devedra Fadanaivs Boycotted Oath Talking Ceremony
Devedra Fadanaivs Boycotted Oath Talking Ceremony

मुंबई : राज्यमंत्रीमंडळाचा विस्तार होत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भारतीय जनता पक्षाने या शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार घातला. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडत असल्याची खंत या शपथविधी सोहळ्याला उपस्थित नेत्यांनी व्यक्‍त केली. 

राजकारणात कितीही टोकाचे मतभेद असले तरी शपथविधी सोहळ्याला विरोधी पक्षनेत्यांसह विरोधी पक्षातले अनेक नेते उपस्थित राहतात. लोकशाहीत सरकार व विरोधी पक्षातला हा संवाद व राजशिष्टाचार असतो. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी या शपथविधी सोहळ्यावरच बहिष्कार टाकल्याचे आश्‍चर्य व्यक्‍त केले जात होते. राज्यातील शेतकऱ्यांना या सरकारने फसवी कर्जमाफी दिल्याचा निषेध करत हा बहिष्कार टाकल्याचे विरोधी पक्षाने स्पष्ट केले होते. 

दरम्यान, नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान मुख्यमंत्र्यासोबत सर्व आमदारांच्या फोटो काढण्याच्या कार्यक्रमातही देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील व आशिष शेलार यांनी दांडी मारली होती. मुख्यमंत्र्यासोबत सर्व नवनिर्वाचित आमदारांचा विधानभवनच्या समोर फोटो काढण्याची विधीमंडळाची परंपरा आहे. यावेळी फडणवीस यांनी हजेरी लावली नाही. तर चंद्रकांत पाटील या फोटोच्या ठिकाणाच्या समोरून सर्व आमदारांच्या साक्षीने निघून गेले. 

आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना या ठिकाणी पोहचण्यास वेळ होत असल्याचे कारण देत निषेध व्यक्‍त करून काढता पाय घेतला होता. या प्रकाराची आठवण देखील सत्ताधारी सदस्य या शपथविधी सोहळ्याच्या दरम्यान काढत होते. विरोधी पक्षनेते व विरोधी पक्षाने अशा प्रकारे शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा प्रकार पहिल्यांदाच महाराष्ट्रात घडत असल्याची खंत देखील अनेक आमदारांनी व्यक्‍त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com