कोरोनाच्या पुण्यातील पहिल्या मृताचे गूढ : संसर्ग कसा झाला?

या मृताच्या जवळच्या सर्व नातेवाईकांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.
corona pune nayadu hospital
corona pune nayadu hospital

पुणे : कोरोना विषाणूंचा संसर्गामुळे पुण्यात एका रुग्णाचा सोमवारी दुपारी मृत्यू झाला. या रुग्णाच्या संपर्कातील 36 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी कोणालाही कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. त्यामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाला नेमका संसर्ग झाला कसा, याची निश्चित माहिती मिळाली नसल्याचे आरोग्य खात्यातर्फे सांगण्यात आले.


पुण्यात रहाणाऱया 52 वर्षीय पुरुषाचा मृत्यू कोरोनामुळे झाला. त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाब होता. त्यांना त्रास होऊ लागल्याने खासगी रुग्णालयात 21 मार्च रोजी उपचारासाठी दाखल केले. या दरम्यान, त्यांना न्यूमोनिया झाला. त्यामुळे दोन्ही फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी झाली. रक्तातील प्राणवायूचे प्रमाण कमी होऊ लागल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर, साडाबारा वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले. कोविड 19 विषाणूंच्या संसर्ग हे त्यांच्या मृत्ये कारण असल्याचे हेथ सर्टिफिकीटवर नमूद केल्याची माहिती डाँक्टरांनी दिली. 

मृत्यू झालेल्या रुग्णाचे आँफिस ठाण्यात होते. ते कुटुंबासह पुण्यात रहात होते. त्यामुळे ठाणे ते पुणे असा नियमित प्रवास ते करत असतं. त्यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये परदेश प्रवास केला नव्हता. तसेच, परदेशातून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कही आलेला नव्हता, त्यामुळे त्यांना नेमका संपर्क कुठून झाला, याची निश्चित माहिती नाही, असेही महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. त्यांच्या जवळच्या सर्व नातेवाईकांची आणि संपर्कातील व्यक्तींची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे, असेही विभागातील अधिकाऱयांनी स्पष्ट केले.

सोसायट्यांतील सभासदांनी खरेदीसाठी गर्दी टाळावी

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी घराबाहेर पडून सभासदांनी अनावश्यक गर्दी टाळावी, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश सहकार विभागाने गृहनिर्माण सोसायट्यांना दिले आहेत. 
गृहनिर्माण सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ  प्रवेश करणाच्या प्रत्येक व्यक्तीला हात स्वच्छ करण्यास सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावे.

इंटरकॉमद्वारे प्रत्येक सदस्यास आवश्यक किराणा, भाजीपाला आदी बाबींची मागणी संकलित करून त्यानुसार जवळच्या किराणा व भाजीपाला पुरवठा करणाऱ्या दुकानधारकास जीवनावश्यक वस्तूंची मागणी (सदस्य निहाय) देऊन सामान गेटवरतीच मागवून घ्यावे. एकेका सदस्याच्या घरी सिक्युरीटीमार्फत सामान पोचवावे किंवा प्रत्येक घरातील एका सदस्यास बोलवून गेटवरती त्याचे वाटप करावे. मात्र ते करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी.

सोसायटीतील सभासद तातडीच्या न टाळता येणाऱ्या कारणाशिवाय बाहेर जाणार नाहीत, याची दक्षता सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यावी. कोरोना संसर्गजन्य साथीच्या रोगाच्या प्रतिबंधासाठी नेमण्यात आलेले आरोग्यसेवक, डॉक्टर, नर्सेस, वार्ड बॉईज यांना त्यांच्या निवडीच्या वेळेप्रमाणे सोसायटीमधून जा-ये करण्यास कोणत्याही प्रकारे प्रतिबंध करु नये. आरोग्यसेवक, डॉक्टर, नर्सेस, वार्ड बॉईज व इतर मेडीकल कर्मचारी आपत्कालीन परिस्थितीत कार्यरत असल्याने त्यांच्यासोबत सौजन्याची वागणूक ठेवावी. तसेच, ते सोसायटीमध्ये भाडेतत्त्वावर सदनिका घेवून राहत असल्यास त्यांना कोणत्याही वाजवी कारणाशिणय सदनिका सोडण्याबाबत दबाव आणू नये. या प्रकरणी सर्व आवश्यक खबरदारी सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यावी, असे निर्देश पुणे शहर (क्रमांक 6) उपनिबंधक सहकारी संस्था उज्वला माळशिकारे यांनी दिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com