विधीमंडळ अधिवेशनाचा पहिला दिवस अजित पवारांचा!

...
sarkarnama vidhansabha
sarkarnama vidhansabha

मुंबई : सरकार बदलल्यानंतर नव्या सरकारच्या कामाबाबत विरोधी पक्ष नाराजी व्यक्त करत आहे. मात्र, विधीमंडळ आणि मंत्रालयात काँग्रेस आणि शिवसेनेच्या तुलनेत राष्ट्रवादीच्या मंत्र्याकडील काम घेऊन येणाऱ्या लोकांची गर्दी शिवसेनेला धडकी भरावी अशी आहे. त्यातही अजित पवार यांच्याकड़े होणारी गर्दी मुख्यमंत्रीपदाला शोभवी अशी आहे.

आज विधीमंडळ अधिवेशनच्या पहिल्या दिवशी मंत्रालयाबरोबरच विधीमंडळातील अजित पवार यांच्या केबिन बाहेर सर्वाधिक गर्दी होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे या किंवा इतर कुणापेक्षा ही गर्दी अजित पवार यांच्या भेटीसाठी अधिक होती. विधानसभा आणि विधान परिषदेचे कामकाज एका पाठोपाठ संपले. त्यानंतर महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक झाली. हे सर्व होईपर्यंत विधानसभेतील पवार यांच्या कार्यालयाबाहेर गर्दी कायम होती.

अजित पवार यांनीही आज विविध घोषणा करत दिवस गाजवला. सोलापुरातील भाजपचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने तेथील राजकीय घडामोडींनी आताच वेग घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या जागेवर पोटनिवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली. ही जागा पूर्वी काँग्रेसने लढवलेली होती, आता उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडी यांच्या नेत्यांशी बोलावं लागेल. त्यांचे एकमत झाले तर महाविकास आघाडीचा काँग्रेसचा उमेदवार येथून निवडणूक लढवेल, अशी घोषणा त्यांनी केली.

जयसिद्धेश्वर स्वामी हे उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात जाऊन अजून आपली बाजू मांडू शकतात. त्यामुळे लगेच येथे पोटनिवडणूक लागेल, अशी अपेक्षा नाही. मात्र महाविकास आघाडीने येथे तयारी सुरू केली आहे.

विधीमंडळ अधिवेशनाच्या दरम्यान पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी सांगितले की आम्ही सुरुवातीच्या टप्प्यात शेतकरी कर्जमाफीसाठी दोन महिन्यांत काम केले. आज परभणी, अहमदनगर, पुणे आणि एक जिल्हा या चार जिल्यातील शेतकऱ्यांशी चर्चा केली. आयटी आणि सहकार विभाग यात जोडले आहेत. त्यावर वित्त विभागाचे लक्ष आहे. सगळे शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. एकदा येऊन अंगठा दिला आणि कर्जमुक्ती झाली, अशी स्थिती आहे. आज झालेल्या व्हीडिओ काॅन्फरन्समध्ये शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com