उस्मानाबाद निर्धास्त होता...आता तेथेही कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला

हेरुन आलेल्याचा बुधवारपर्यंतचा आकडा जवळपास ५५ हजाराच्या जवळपास गेला होता. त्यावरुन कोरोना विषाणुचा धोका जिल्ह्यामध्ये बळावणार असल्याचे सांगितले जात आहे.
corona 11.
corona 11.

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोना विषाणुचा एकाही व्यक्तीचा अहवाल पॉझीटिव्ह आला नव्हता, पण गुरुवारी आलेल्या अहवालामध्ये एकजण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. बुधवारी या व्यक्तीला उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. गुरुवारी या व्यक्तीचा स्वॅब घेण्यात आला होता.

आज या अहवालाने जिल्ह्यात कोरोना विषाणुचा पहिल्या रुग्णाची नोंद झाली आहे. या तरुणाची ट्रव्हल्स हिस्ट्री काढली असुन तो व्यक्ती दिल्ली ते पानीपत अशा सहलीला गेला होता अशी माहिती आहे. पण गेल्या पाच सहा दिवसापासून तो गावात होता असही गावकर्‍यांनी सांगितले.

आता या व्यक्तीच्या संपर्कात किती लोक आली आहेत याची प्रशासन माहिती घेत असल्यानचे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली आहे. सध्या जिल्ह्यातील १३६ जणांना क्वारटाईन करण्यात आले आहे. यातील तेरा जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर परजिल्ह्यातुन तसेच परदेशातुन लोकांचा ओढा सूरु असल्याने कोरोनाचा धोका वाढला होता. 

आज पहिला रुग्ण सापडला आहे. यापुढे ही साखळी थांबविण्याचे मोठ आव्हान प्रशासन तसेच आरोग्य विभागावर असणार आहे. बाहेरुन आलेल्याचा बुधवारपर्यंतचा आकडा जवळपास ५५  हजाराच्या जवळपास गेला होता. त्यावरुन कोरोना विषाणुचा धोका जिल्ह्यामध्ये बळावणार असल्याचे सांगितले जात आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com