कऱ्हाडात आढळला कोरोनाचा पहिला रूग्ण 

सातारा जिल्ह्यात तिसरा कोरोना बाधित रूग्ण सापडल्याने प्रशासन सतर्क झाले असून नागरीकांनी प्रतिबंधात्मक उपायांवर भर द्यावा, असे आवाहन डॉ. गडीकर यांनी केले आहे.
first corona positive patient found in karad
first corona positive patient found in karad

सातारा : कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे काल (बुधवारी) दाखल केलेल्या एका रुग्णाचा अहवाला कोरोना (कोविड 19) बाधित असल्याचे तर इतर 18 संशयित रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे एनआयव्ही पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

सातारा जिल्ह्यात सुरवातीला 23 मार्चला पहिला कोरोना बाधित रूग्ण सापडला होता. त्यानंतर 24 तारखेला कॉलिफोर्नियातून आलेल्या युवक बाधित असल्याचे निष्पन्न झाले होते. या दोघांवर जिल्हा रूग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. त्यानंतर दोन एप्रिलपर्यंत एकही कोरोना बाधित रूग्ण सापडलेला नव्हता. मात्र, आज कऱ्हाडात पहिला कोरोना बाधित रूग्ण आढळला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या तीन झाली आहे. तसेच इतर 18 संशयित रूग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

कऱ्हाडात पहिला बाधित रूग्ण सापडल्याने कऱ्हाड शहरासह परिसरात आता आरोग्य विभागाच्या वतीने या रूग्णाच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींचा शोध घेण्याची मोहिम सुरू करण्यात आली आहे. सध्या साताऱ्यातील जिल्हा शासकिय रूग्णालयात 73, कऱ्हाडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये 30 तर खासगी हॉस्पिटलमध्ये एक असे 104 संशयित रूग्ण दाखल होते. या सर्वांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी तिघांचे अहवाल कोरोना बाधित असल्याचे आले आहेत. तर 97 जणांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. अद्याप चार संशयितांचे अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत 97 जणांना रूग्णालयातून डिस्चार्ज दिला आहे. होम क्वारंटाईनमध्ये 554 व्यक्ती आहेत. सातारा जिल्ह्यात तिसरा कोरोना बाधित रूग्ण सापडल्याने प्रशासन सतर्क झाले असून नागरीकांनी प्रतिबंधात्मक उपायांवर भर द्यावा, असे आवाहन डॉ. गडीकर यांनी केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com