राज्यातील पहिले कोरोना पेशंट असलेले हे दांपत्य तर या औषधानेच बरे झाले! #fightagainstcorona

पुणे महापालिकेच्या नायडू रुग्णालयात हे रुग्ण दांपत्य होते. त्यांच्यावर यशस्वी उपचार झाले. त्यामुळे कोरोनाची धास्ती घेण्याची काळजी नाही.
corona pune naydu hospital
corona pune naydu hospital

पुणे : देशात पहिल्यांदा कोरोना पॉझिटिव्ह सापडलेले पुण्यातील दांपत्य काेरोनामुक्त झाले आहे. सोमवारी त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली. आज त्यांची आणखी टेस्ट घेतल्यानंतर आज सायंकाळी किंवा उद्या सकाळी त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. ताप, खोकला, सर्दी तसेच मलेरियाच्या आजारांवरील औषधे दिली जातात. कोरोनासाठी विशिष्ट अशी कोणतीच औषधे उपलब्ध नाहीत. त्यामुळे या औषधावरच भर दिला जातो. याच औषधांनी रूग्ण बरे होत आहेत.

नायडू रुग्णालयांतील डाॅक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार Oseltamivir हे औषध भारतात तापासाठी, कफ यासाठी वापरतात. यासोबत वेदना कमी होण्यासाठी paracetamol वापरण्यात आले. या रुग्णांना आणि इतरांनाही अतिशय सौम्य लक्षणे आहेत. त्यामुळे फार ताकदीच्या औषधांची गरज पडली नसल्याचे सांगण्यात आले.   

या दांपत्याला नायडू रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुण्यात आणि राज्यात इतरत्र अनेक रूग्ण सापडले. त्यातील बहुतांश सर्वजणांची प्रकृती ठणठरीत आहे. पुण्यातील या दांपत्यावर नऊ मार्चपासून डॉक्टर उपचार करीत आहेत. राज्यातील हे पहिलेच दोन रूग्ण होते. त्यामुळे याची राज्यभर चर्चा झाली.

चौदा दिवस नायडू रूग्णालयात उपचार केल्यानंतर सोमवारी त्यांची कोरोना टेस्ट घेण्यात आली. ही टेस्ट निगेटिव्ह आली आहे. चोवीस तासानंतर आज पुन्हा त्यांची टेस्ट घेण्यात येणार आहेे ही टेस्ट निगेटिव्ह आली तर त्यांना घरी सोडण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले. या दाम्पत्याची सोमवारी घेण्यात आलेली टेस्ट निगेटिव्ह आली असून आज घेण्यात येणारी टेस्ट निगेटिव्ह येण्यात कोणतीच वाटत नाही. कोरोनावरील उपचाराच्या घालून देण्यात आलेल्या उपचार पद्धतीनुसार दुसरी टेस्ट निगेटिव्ह आली तरच अशा रूग्णांना घरी सोडण्याची परवानगी आहे. त्यामुळे आज घेण्यात येणाऱ्या टेस्टच्या परिणामांवरच या रूग्णांचा डिस्चार्ज अवू

या संदर्भात पुण्याचे महापौर पुरलीधर मोहोळ यांनीदेखील समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘सध्याच्या वातावरणात ही दिलासा देणारी बाब आहे. कोरोनावर चांगल्याप्रकारे उपचार होऊ शकतात याबाबत नागरीकांमध्ये विश्‍वास निर्माण होण्याची गरज आहे. पुण्यातील य पहिल्या रूग्ण दांपत्यावर झालेल्या यशस्वी उपचारांमुळे नागरीकांचा महापालिकेच्या यंत्रणेवरचा विश्‍वास वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे त्यांचे या आजारातून बरे होणे व त्यांना डिस्चार्ज मिळणे महत्वाची बाब आहे.’’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com