खानदेशातील जळगावात कोरोनाचा पहिला बळी

'कोरोना'च्या ससंर्गाचे प्रमाण वाढत असतांनाच खानदेशातील जळगाव जिल्ह्यात 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा 'कोरोना'च्या संसंर्गाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्राणाही हादरली आहे
First Corona Death in Jalgaon
First Corona Death in Jalgaon

जळगाव : 'कोरोना'च्या ससंर्गाचे प्रमाण वाढत असतांनाच खानदेशातील जळगाव जिल्ह्यात 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा 'कोरोना'च्या संसंर्गाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्राणाही हादरली आहे. काल रात्री या वृध्दाला उपचारासाठी जळगाव येथील जिल्हा शासकीय वैदयकिय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते.

कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण हा गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने त्याच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. या रुग्णाला कोरोनाची लक्षणे दिसून येत असल्याने याठिकाणाहून त्यांची जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात तपासणी करण्यात आली. दरम्यान या रुग्णाचा अहवाल बुधवारी सायंकाळी 'पॉझिटिव्ह' आल्यानंतर संपूर्ण शहरात खळबळ माजली होती. 

या साठ वर्षीय रुग्णावर जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु असतांना आज दुपारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.शहरात कोरोनाच्या रुग्णाचा पहिला बळी गेल्याने संपूर्ण वैद्यकीय, आरोग्य यंत्रणेसह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा हादरुन गेली आहे. जळगावात पहिला रूग्ण 28 मार्चला आढळला होता. त्याच्यावर जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com