महाविकास आघाडी - भाजपमध्ये तीन नगरपंचायतींसाठी 29 डिसेंबरला सामना 

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड व हातकणंगले आणि यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकी या नवनिर्मित 3 नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणूका होत आहेत .
devendra-fadanvis-uddhav-thakare
devendra-fadanvis-uddhav-thakare

मुंबई : राज्यात महाविकास आघाडी आणि भाजप  यांच्यात  तीन नगरपंचायतीत होणार असलेल्या निवडणुकांच्या निमित्ताने प्रथमच सामना होणार आहे .  राज्यातील सत्तांतरानंतर पहिल्यांदाच आघाडी आणि भाजप मतदारांसमोर जाणार आहेत . 

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड व हातकणंगले आणि यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकी या नवनिर्मित 3 नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणूका होत आहेत .

या तीन नगर पंचायती  तसेच 26 नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील विविध नगरसेवकांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी 29 डिसेंबर  रोजी मतदान; तर 30 डिसेंबर  रोजी मतमोजणी होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.

श्री. मदान यांनी सांगितले की, संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकांसाठी 4 ते 12 डिसेंबर  या कालावधीत नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील.

8 डिसेंबर  रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत.

 छाननी 13 डिसेंबर 2019 रोजी होईल. 

अपील नसलेल्या ठिकाणी 18 डिसेंबर 2019 रोजी नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. 

अपील असलेल्या ठिकाणी न्यायालयाचा निकाल आल्यानंतर तिसऱ्या दिवसापर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील.

29 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 

30 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होईल.
 

नगरपरिषद/ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुका: मोर्शी, धरणगाव, रत्नागिरी आणि सावंतवाडी.

नगरपरिषद/ नगरपंचायतनिहाय पोटनिवडणूक होणाऱ्या जागांचा तपशील: गडहिंग्लज- हद्दवाढ क्षेत्रासाठी, 

मलकापूर- 7ब,

 वाई- 8अ, 

खानापूर- 7, 

बार्शी- 5अ, 

मनमाड- 1ब,

 भुसावळ- 4अ,

 भडगाव- 3ड

, नवापूर- 6अ आणि 7अ, 

परंडा- 7ब, 

कळंब- 8ब, 

उमरेड- 11अ,

 भिवापूर- 4, 

सिंधी (रेल्वे)- 8क, 

मोहाडी- 4, 9 आणि 12, 

साकोली- 6ब, 

कोरपणा- 16, 

भामरागड- 5 आणि 16.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com